अण्णापुर खुन प्रकरण प्रेमसंबंधातुनच

आण्णापूर,  ता.१७ जुलै २०१६ (प्रतिनीधी) : येथील सुनील छबू पवार यांच्या खून प्रकरणाचा शिरुर पोलिसांनी अवघ्या ८ दिवसांत छडा लावला असुन याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पञकार परिषदेत सांगितले.

मारुती संभाजी कुरुंदळे (रा .आण्णापुर ता .शिरूर),व सोन्या उर्फ महादेव कमलाकर पवार (रा.धुमळीचा मळा,केडगाव,ता.दौंड) असे अटक केलेल्या अारोपींची नावे असुन त्याच्य़ा कडून गुन्ह्यात वापर केलेला एक कोयता, पल्सर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

या दोघांना शिरूर प्रथम वर्ग न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी बोलताना सांगितले.या खुन प्रकरणात अारोपींनी अतिशय निर्दयीपणे खुन केला असल्याचे ही गावडे यांनी सागितले.

या संदर्भात अधिक माहिती अशी कि,सुनिल पवार याचे प्रेम संबंध मारुती कुरुंदळे (रा.आण्णापुर ता शिरूर)यांच्या बहीनीशी असल्याचे कारणांवरुन व त्या गोष्टीचा राग मनात धरून मारुती करूंदळे याने साथीदारसह  त्याच्य़ा  डोक्यात धारदार शस्राने वार करून त्याला जखमी करून त्याचा खूण केला आहे.अशी फिर्याद मयत सुनिल पवार यांचा भाऊ सतीश पवार याने दिली होती.याच फिर्यादी वर पोलीसांनी तपास सुरू केला असता, पवार व त्या महिलेचे प्रेमसंबंध असल्याचे तसेच पवार या महिलेला गावाच्या आजूबाजूला इतर ठिकाणी दुचाकीवरून घेऊन जात असल्याचे पोलिसांना समजले.

त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक जय जाधव, पुणे ग्रामीनचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर चे पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी अारोपींच्या शोधासाठी तपास सुरु केला. अारोपींनी खून हा अतिशय निर्दयी पणे केला असल्याने याबाबत सर्वच बाबीचा अभ्यास करून संशयित आरोपी यांच्या मोबाईल,त्याचे सीमकार्ड तपासले तसेच त्याचा ठावठिकाणा घेतला.परंतु अारोपीला सुगावा लागताच अारोपी पोलीसांना गुंगारा देत होता.अखेर कवठे (ता.शिरूर)येथे आरोपी ची बहीण आहे. तेथे तो येत असल्याचे समजल्यावर तेथे पोलीस निरिक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज नवसारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, पोलीस कर्मचारी के.डी.थोरात, श्रावण गूपचे,रविंद्र पाटमास, नितीन गायकवाड, साबळे, जनार्दन शेळके, संतोष आवटी, वैभव मोरे, चंद्रकांत जाधव, मुद्स्सर शेख यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी मारुती कुरुंदळे याला अटक केली.

या वेळी कुरुंदळे याने खूनाची कबुली दिली.तसेच त्याने हा खून करताना साथीदार सोन्या पवार याचे नाव सांगितले. त्याला केडगाव ता .दौंड येथून अटक केली. यांनी हा खून बहिणी शी सुनिल पवार याचे प्रेम होते या रांगातून त्याचा खूण केला असल्याचे सांगितले.तर हे दोन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या कडून आणखी गुन्हे उघडिस येण्याची शक्यता तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व्यक्त केली  आहे .Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या