शिरूर शहरातील सर्वधर्मसमभाव आदर्शवत-खा.अाढळराव

शिरूर ,  ता.१८ जुलै २०१६ (मुकुंद ढोबळे) : शिरूर शहरात सर्वधर्म समभाव व सर्व समाज एकत्रित नांदतात हे खुप आदर्शवत अाहे असे मत शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. ,

शिरूर नगर परिषद महिला बालकल्याण समिती यांच्या वतीने यांच्या वतीने शिरूर नगरपरिषद कार्यालय येथे ईदमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरांतील नागरिकांना शिरखूर्मा व स्नेह भोजन देण्यात आले या कार्यक्रमात  खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते .
 यावेळी शिरूर चे आमदार बाबूराव पाचर्णे, सभागृह नेते प्रकाशभाऊ धारिवाल, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष केशरसिंग परदेशी, नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार निकम्, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सी.टी.बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य के .सी.मोहिते, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुवर्णा लटांबळे, शिरूर मुस्लिम जमात अध्यक्ष इकबाल सौदागर, नसीम खान , नामदेव घावटे, शिरूर शहर विकास आघाडी चे नेते प्रभाकर ढेरे, रविंद्र करंजखिले, सुनिल बाणखिले, संघपती शांतिलाल कोठारी, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, अादी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुस्लिम बांधवांच्या सभागृहसाठी पंधरालाख रुपये खासदार निधीतून देणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली
 
यावेळी बोलताना आमदार बाबूराव पाचर्णे म्हणाले शिरूर येथील जातीय सलोखा हा देश राज्यांतील एकमेव उदाहरण आहे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे पाचर्णे यानी सांगितले.सभागृह नेते प्रकाशभाऊ धारिवाल म्हणाले शिरूर शहरात असणारी सर्वधर्मसमभाव ही भावना कायम अबाधित राहील अशी ग्वाही धारिवाल यांनी दिली .
 
यावेळी बोलताना नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे यांनी शिरूर मधे सर्वधर्म एकत्र एक विचाराने राहत असून हे राज्यात एकमेव उदाहरण असल्याचे सांगितले .सूत्रसंचालन संजय बारवकर, बाळू ओस्तवाल, स्वागत संतोष भंडारी,प्रास्ताविक महिलाबाल कल्याण सभापती सुवर्णा लटांबळे तर आभार महेंद्र मल्लाव यांनी मानले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या