घोड धरणातील पाण्याचे शिंदोडी ग्रामस्थांनी केले जलपुजन

शिंदोडी, ता.१९ जुलै २०१६ (तेजस फडके) : घोडधरणात ३० टक्के पाणीसाठा झाल्याने शिंदोडी येथील नंदा व सुरेश ओव्हाळ या दांपत्याच्या वतीने जलपुजन करण्यात आले.

या वर्षी प्रथमच घोडधरणाच्या पाण्याने तळ गाठला होता.तसेच सुमारे ६० वर्षानंतर जुने शिंदोडी गाव उघड पडलं होते.त्यामुळे १२ महीने पाण्याची कमतरता नसलेल्या शिंदोडीकरांना या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागला.त्यामुळे पाण्याचे महत्व पटल्याने जलपुजन करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी  सांगितले.

येडगाव आणि वडज या दोन धरणातुन चिंचणी (ता.शिरुर) येथील घोड धरणात पाणी सोडण्यात आले होते. सध्या घोडधरणात ३० टक्के पाणीसाठा झाला असुन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणात चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.यावेळी शिवसेना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश ओव्हाळ, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाळुंज, युवा कार्यकर्ते प्रकाश शिंदे, रामकृष्ण गायकवाड, योगेश वाळुंज, रोहन वाळुंज व प्रमोद डोळस उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या