चासकमान कालव्यातुन शेतीसाठी अावर्तन सोडनार

शिरूर ,  ता.२०जुलै २०१६ (प्रतिनीधी) : शेतक-यांच्या मागणीचा विचार करत खरीप हंगामासाठी चासकमान कालव्यातुन (ता.२३) पासुन पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती अामदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.

या संदर्भात मुंबई येथे पालकमंञी गिरिष बापट यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली.या बैठकिला अामदार बाबुराव पाचर्णे, दिलीप वळसे पाटील, सुरेश गोरे,माजी अामदार अशोक पवार, संग्राम थोपटे, कृष्णा खोरे महामंडळाचे अार.बी.घोटे, टी.एन.मुंढे, मुख्य अभियंता अतुल कपोले, जी.एन.लोंढे,शहापुरे अादी उपस्थित होते.
सध्या चासकमान धरणात ५७.२२ टक्के (४.३३ टी.एम.सी) व कळमोडी धरणात १.५१ टी.एम.सी असे दोन्ही मिळुन सुमारे ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला अाहे.
शिरुर व खेड तालुक्यातील शेतक-यांच्या मागणीचा विचार करत खरिप हंगामासाठी (ता.२३) पासुन टेल टु हेड अशा पद्धतीने पाणी वाटप केले जाणार असुन हे अावर्तन सुमारे ४५ दिवसांसाठी सोडले जाणार असल्याची माहिती अामदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या