गुरूपौर्णिमेनिमीत्त रोटरी ने केला २१ गुरूजनांचा गौरव

शिक्रापूर ,  ता. २१ जुलै २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : गुरूपौर्णिमेनिमीत्त शिक्रापूर रोटरी क्लबच्या वतीने कासारी येथील शिक्षिका नसीमा काझी–मुल्ला यांच्यासह २१ शिक्षकांचा ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देवून गौरव करण्यात आला.

शिक्रापूर रोटरी क्लबच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून गुरूपौर्णीमेनिमीत्त शिरूर तालुक्यातील 21 प्राथमिक, माध्यमिक व सेवानिवॄत्त शिक्षकांचा माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त शिक्षक पुढीलप्रमाणे : जगदीश राउत मारे(आर.बी.गुजर प्रशाला, तळेगाव ढमढेरे), गुलाबराव डाळींबकर(विद्या विकास मंदिर करंदी), नसीमा काझी–मुल्ला(सौ.हिराबार्इ गो.गायकवाड विद्यालय, कासारी), रमेश जाधव(विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी), संदीप खटके(विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर), मोहन बोराटे(स्वातंञ्य सैनिक डावखरे विद्यालय, हिवरे), संतोष डफळ(संभाजीराजे विद्यालय जातेगाव बुद्रुक), गणेश खेडकर(काळभैरवनाथ विद्यालय कोयाळी), रत्नमाला देशमुख(केंद्रप्रमुख,शिक्रापूर), मिनाक्षी चेडे–व्यवहारे(समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे), मंगल दोरगे(जि.प.प्राथ.शाळा, कोयाळी पुर्वसन), आलोचना मांढरे(जि.प.प्राथ.शाळा शिक्रापूर), चेतना ढमढेरे(कुसुमार्इ महिला विकास प्रतिष्ठाण तळेगाव ढमढेरे), नानासाहेब शिर्के, बाबुराव साकोरे, ज्ञानेश्वर भुजबळ, श्रीधर टेमगीरे, सोपानराव धुमाळ, महादू क्षिरसागर, धर्मराज भुजबळ, तिरसिंग धुमाळ(सर्व सेवानिवॄत्त मुख्याध्यापक).

याप्रसंगी रोटरी क्लबमध्ये काम करत असतानाच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेल्या प्राचार्य रामदास थिटे, प्रा.संजीव मांढरे, रमेश वाळके, प्रा.संजय देशमुख, प्रा.मनोहर परदेशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास जलतज्ञ डॉ.सतिष खाडे, पंचायत समीती सदस्या दिपाली शेळके, माजी सरपंच आबासाहेब करंजे, सहाय्यक प्रांतपाल विरधवल करंजे, उद्योजक रविंद्र भुजबळ, रोटरीचे मानद सचिव डॉ.मच्छिंद्र गायकवाड, कॄषीतज्ञ दिलीप पेंडसे, राज्य शिक्षक परीषदेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव गवळे, कार्यवाह उकीर्डे सर, लधाराम पटेल, मधुकर टेमगीरे, डॉ.रामदास पोटे, रमेश भुजबळ, नवनाथ सासवडे, मोहन विरोळे, सुर्यकांत शिर्के, मयुर करंजे, प्रितम शिर्के, हर्षवर्धन दोरगे, नितीन गायकवाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे सचिव रामदास थिटे यांनी केले.संजीव मांढरे यांनी सुत्रसंचालन केले तर मयुर करंजे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या