पुनर्वसनासाठीचे राखीव शेरे काढण्याची पाचर्णेंची मागणी

शिरूर ,  ता.२२जुलै २०१६ (प्रतिनीधी) : पुणे जिल्हयातील भामा अासखेड प्रकल्प लाभक्षेञातील शेतक-यांना पाणी मिळणार नसल्याने सातबारावरील इतर अधिकारातील पुनर्वसनासाठी राखीव शेरे काढण्यात यावे अशी मागणी औचित्याच्या मुद्द्यावर अामदार बाबुराव पाचर्णे यांनी सभागृहात केली.


पुणे जिल्ह्यातील पुणे शहराच्या पुर्व भागासाठी राबविण्यात येत असलेल्या भामा अासखेड पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या काहि महिन्यांपासुन बंद अाहे.पुणे शहरासाठी भामा अासखेड धरणातुन २ टिएमसी पाणीसाठा राज्य शासनाने मंजुर केला अाहे.

पुणे शहराच्या पुर्व भागासाठी ४४७ कोटि रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी केंद्र शासनाच्या जे.एन.यु.अार.एम योजनेंतर्गत ३८० कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला अाहे.माञ मार्च २०१७ अखेर या योजनेचे काम पुर्ण करण्याची मुदत असताना भामा अासखेड धरणातील प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी या योजनेचे काम बंद पाडलेले अाहे.

भामा अासखेड धरणातील प्रकल्पाच्या लाभक्षेञातील शिरुर,हवेली, दौंड, खेड तालुक्यातील अनेक शेतक-यांना पाणी मिळणार नसल्याने सातबारावरील इतर अधिकारातील पुनर्वसनासाठी राखीव असे असलेले शेरे काढण्याची मागणी त्यांनी सभागृहात मांडली.

या बाबत पुनर्वसन मंञी चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील तातडीने बैठक घेउन निर्णय घेणार असल्याचे जाहिर केल्याची माहिती अामदार  बाबुराव पाचर्णे यांनी दिली. 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या