बदललेल्या जीवनशैलीमुळे जागतिक तापमान वाढ : डॉ.खाडे

शिक्रापूर ,  ता. २६ जुलै २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : बदललेल्या जीवनशैलीमुळे जागतीक तापमान वाढ झाल्यानेच दुष्काळाचे संकट ओढवले असल्याचे मत राष्ट्रीय किर्तीचे जलतज्ञ डॉ. सतिष खाडे यांनी बोलताना व्यक्त केले.

शिक्रापूर येथे ‘पाण्याचे नियोजन’ या विषयावर डॉ.खाडे मार्गदर्शन करत होते.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, जमीनीतील पाणी संपत आहे, जमीनीवरील पाणी दूषीत आहे तर पावसाचे पाणी साठवून ठेवले जात नाही त्यामुळे  पाणी टंचार्इ व दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

जलयुक्त शिवार योजनेची व्याप्ती वाढवून जमीनीतील व जमीनीवरील पाणी साठा वाढविणे आवश्यक आहे.आजही 21 व्या शतकात जगातील 200 कोटी महिला हंडयाने डोक्यावरून पाणी वाहतात यावरून पाणी टंचार्इची तिव्रता सहजतेने लक्षात येते.महाराष्ट्रातील पुणे, मुंबर्इ व नाशीक जिल्हयात सर्वाधिक पाणी वापरले जाते.त्यातील बहुतांश पाणी हे औद्योगिक क्षेत्राकडे वळविले जाते.अयोग्य औद्योगिक धोरणाचा देखील सर्व राज्याला फटका बसत आहे.पाण्याचे व्यवस्थापन व योग्य नियोजन करण्यासाठी सांडपाणी जमीनीत जिरवणे, बोअरवेल रीचार्ज, शेततळे, बंधारे, फेरोक्रेट बंधारे, टायर बंधारे, वनरार्इ बंधारे बांधणे, गळके बंधारे दुरूस्त करणे आदी उपाययोजना सुचवितानाच डॉ.खाडे यांनी स्थानिक पातळीवर नियोजन करण्याचे नागरीकांना आवाहन केले.

या कार्यक्रमास माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पंचायत समीती सदस्या दिपाली शेके, माजी सरपंच आबासाहेब करंजे, विरधवल करंजे, उद्योजक रविंद्र भुजबळ, डॉ.मच्छिंद्र गायकवाड, कॄषीतज्ञ दिलीप पेंडसे, प्राचार्य रामदास थिटे, राज्य शिक्षक परीषदेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव गवळे, कार्यवाह उकीर्डे सर, शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला, संजीव मांढरे, लधाराम पटेल, मधुकर टेमगीरे, डॉ.रामदास पोटे, रमेश भुजबळ, नवनाथ सासवडे, मोहन विरोळे, सुर्यकांत शिर्के, प्रितम शिर्के, हर्षवर्धन दोरगे, नितीन गायकवाड, प्रा.संजय देशमुख आदी उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या