'विद्वत्ता' चे सी.ए. परिक्षेत यश

शिरूर ,  ता.२७ जुलै २०१६ (मुकुंद ढोबळे) : येथील विद्वत्ता सुनिल बाफणा हिने सी.ए.(चार्टड अकाउंट)परीक्षेत उज्जवल यश प्राप्त करत एकविसाव्या वर्षातच तिने हे यश संपादन करण्याचा बहुमान मिळवला अाहे.

विद्वत्ता ने पुणे येथील बी .एम .सी सी .कॉलेज मधे शिक्षण घेतले असून ,येथील जैन स्थानकवासी संघाचे विशस्त कांतीलाल बाफणा यांची ती नात तर शिरूर चे माजी नगरसेवक सुनील बाफणा यांची मुलगी आहे.या परीक्षेकरीता तिला एस.पी.सी.एम.फर्म  प्रा.सुहास बोरा व चेतन पारख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

तिच्या यशाबद्द्ल उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल,नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे यांनी तिचे अभिनंदन केले.यावेळी बोलताना विद्वत्ता बाफणा हिने क्लास चे शिक्षक व घरातील सर्व कुटुंबीय यांनी दिलेल्या प्रोत्साहन यामुळे हे यश संपादन केले असल्याचे सांगितले ग्रामीण भागातील विद्यार्थी यांनी स्पर्धा परीक्षा असो वा सी ए सारख्या परीक्षा असो याबद्दल कुठलीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे गेले तर यश नक्कीच मिळत असल्याचे विद्वत्ता बाफणा हिने सांगितले .
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या