'साईकृपा'ची झाली कृपा; दोन कोटी रुपये शेतक-यांना अदा

शिरूर ,  ता.२८जुलै २०१६ (प्रतिनीधी)  : गेल्या अनेक दिवसांपासुन  शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे रखडलेले सुमारे २कोटी ५७ लाख रुपयांचे थकित पेमेंट चेक स्वरुपात दिले असल्याची माहिती अांदोलक योगेश विठ्ठल ओव्हाळ यांनी दिली.


ऊस गाळपाचे थकित पेमेंट न दिल्याने शिरुर तहसिल कार्यालयासमोर शिवसेनेचे शेतकरी अाघाडीचे योगेश ओव्हाळ,गणेश जामदार, साईक्रांती चे नवनाथ निचीत,श्रीकांत निचीत माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्यासह शेतकरी धरणे आंदोलनास गेल्या काही दिवसांपासुन बसले  होते. 

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या  साईकृपा शुगर या कारखान्याने शिरुर तालुक्यातील  धानोरे ,वानेवाडी ,वडनेर ,पिंपळसुटी ,मांडवगण फराटा ,मुखई ,मलठन ,धामारी जांबुत ,जातेगाव बु.टाकळीहाजी,डिन्ग्रवाडी ,आंबळे ,उरळगाव ,कवठेयमाई ,दरेकरवाडी,वाघाळे  , गावांतील
शेतक-यांचे ऊस गाळपाचे  पैसे २२ महिणे होऊनही कारखान्याने दिले नाही.वेळोवेळी कारणे सांगुन कारखाना प्रशासनाने शेतक-यांची फसवणुक केली त्यामुळे उग्र आंदोलन  करणार असल्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकरी व शिवसेना व इतर संघटनेच्या  वतीने नुकताच देण्यात आला होता.

दरम्यान बुधवारी(ता.२७) रोजी साईकृपा कारखान्याच्या व्यवस्थापकिय चर्चेनंनतर कारखाना प्रशासनाच्या अधिका-यांनी अांदोलकांची भेट घेत सुमारे २ कोटी ५७ लाख ८८ हजार २५२ रुपये रक्कम असलेले चेक देण्यात अाले. या वेळी नायब तहसिलदार अशोक पाटील, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, कारखान्याचे अधिकारी वर्ग, शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार,शिवाजी खेडकर अादी उपस्थित होते.

यानंतर सायंकाळी उशिरा अांदोलन स्थगित करण्यात अाले.

तर पुन्हा अांदोलन...

या बाबत शिवसेनेचे योगेश विठ्ठल ओव्हाळ यांनी सांगितले कि, हा शेतक-यांच्या एकजुटीचा विजय असुन प्रशासनाचे देखील यासाठी मोलाचे सहकार्य लाभले अाहे.हे दिलेले धनादेश मुदतीत जर वठले गेले नाही तर पुन्हा शेतकरी व शिवसेना अांदोलन करेल असे ओव्हाळ यांनी बोलताना सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या