सरपंच निवड थेट जनतेतुन व्हावी - अामदार पाचर्णे

शिरूर ,  ता.३०जुलै २०१६ (प्रतिनीधी) :  राज्यशासनाने सरपंच थेट जनतेतुन निवडीसाठी तातडीने धोरण अाखावे अशी मागणी  अामदार बाबुराव पाचर्णे यांनी विधानसभेत  अौचित्याच्या मुद्दयांवर बोलताना केली.

राज्यशासनाने १४व्या वित्त अायोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला अाहे.पाच वर्षांचा  विकास अाराखडा तयार करुन दिलेला निधी खर्च करण्यात येणार अाहे.सरपंच ज्या वॉर्डातुन निवडुन येतो त्याच वॉर्डाचा विचार केला जातो. माञ सरपंच थेट जनतेतुन निवडुन सर्व गावाचा विकास अाराखडा समान करुन गावचा सर्वांगिन विकास होउ शकतो.तसेच निवडणुकीतील अनिष्ट प्रथांना या मुळे अाळा बसु शकतो.

सध्या सदस्यांमधुन निवडताना घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर होतो.या पुर्वी काही सदस्यांना विमानवारी, पळवा-पळवी असे प्रकार घडलेले अाहेत.यामुळे गट तट पडुन वाद निर्माण होतात.कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो.त्या मुळे विकासकामांना देखील खीळ बसते.त्यामुळे सरपंच थेट जनतेतुनच निवडला जावा तसेच याबातचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजुर करुन घ्यावे अशी अाग्रही मागणी  पाचर्णे यांंनी  केली.

यावेळी बोलताना ग्रामविकासमंञी पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले कि, हा धोरणात्मक निर्णय असल्याने विचार करुन सकारात्मक निर्णय घेतला जाइल असे मुंडे यांनी सांगितले असल्याची माहिती अामदार  पाचर्णे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या