मुलांवर वेळीच संस्कार होणे गरजेचे- ल्युसी कुरियन

शिरूर, ता.३१जुलै २०१६ (सतीश केदारी) : समाजात वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे असुरक्षितता जाणवत असुन समाजातील  प्रत्येक घटकाला अंतर्मुख होण्याची गरज असल्याचे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरीयन यांनी निषेध सभेत बोलताना व्यक्त केले.

कोपर्डी घटनेचा निषेध म्हणुन माहेर संस्थेसह जीवन विकास मंदीर, विद्याधाम, रयतची न्यु इंग्लिश स्कुल अादी शाळांनी  मुकमोर्चा काढुन अत्याचाराचा निषेध व्यक्त केला.
पुढे बोलताना कुरीयन म्हणाल्या कि, दररोज घडणा-या घटनांमुळे मन खिन्न होत असुन छोट्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष  केले तर मोठी घटना घडण्यास वेळ लागणार नाही.असे प्रसंग टाळण्यासाठी मुलांवर वेळीच संस्कार होणे गरजेचे अाहे.

या वेळी रविंद्र धनक,संजय बारवकर, पटेल, रामभाउ इंगळे,रेश्मा शेख, साधना दोषी, माहेर च्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, शुभांगी धुमाळे, संगीता गुलदेवकर, राजा शेख अादी ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी  निषेध व्यक्त करुन नायब तहसिलदार अशोक पाटील, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना यासंबंधी निवेदन देण्यात अाले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक दयानंद गावडे म्हणाले कि, कुठेही अनुचित प्रकार समोर अाल्यास व अथवा असुरक्षित वाटत असेल तर मुला-मुलींनी न भिता समोर यावे.जर तसे प्रकार अाढळल्यास दोषींना कडक शिक्षा करण्याचा प्रयत्न केला जाइल.

या प्रसंगी काढलेल्या मुकरॅलीचे नेतृत्व माहेर च्या संस्थापिका  लुसी कुरियन यांनीकेले. त्यानंतर झालेल्या निषेध सभेचे सुञसंचालन विजय तवर यांनी केले तर अाभार मीना भागवत यांनी मानले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या