घोड धरणातुन २५ दरवाज्यांद्वारे पाण्याचा विसर्ग

शिंदोडी, ता.५ अॉगस्ट २०१६ (तेजस फडके) : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणामध्ये गुरुवारी सायंकाळ पर्यंत ८४ % पाणीसाठा झाला असुन दोन्ही कालव्यांव्दारे तसेच २५ दरवाज्यांद्वारे २६४०० क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती शाखा अभियंता माणिक साळवे व एकनाथ भापकर यांनी दिली.

चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडनदीवरील घोडधरणाची साठवण क्षमता ७६३९ दशलक्ष घनफूट असुन मृतसाठा २१७२ दशलक्ष घनफूट तर वापरण्यायोग्य साठा ५४६७ दशलक्ष घनफूट एवढा आहे.

या वर्षी पाणीसाठा अत्यल्प झाल्याने ६० वर्षापुर्वीचे जुने शिंदोडी गाव उघडे पडले होते. जुनच्या सुरवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने धरणातील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. मात्र गेल्या १५ दिवसांपुर्वी वडज व येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने दोनच दिवसात घोडधरणाच्या पाणीसाठ्यात ३३ टक्के वाढ झाली होती. बुधवारी  दि. ३ रोजी वडज व येडगाव धरणातुन पुन्हा घोड नदीपात्रात पाणी सोडण्यात आले . त्यामुळे गुरुवारी ६ वाजेपर्यंत धरणात तब्बल ८४ % पाणीसाठा झाला असून आणखी पाणी येतच आहे.पुरनियंत्रणासाठी धरणाचे २५  दरवाजे दोन फुटांनी उचलुन २६४०० क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणाखालील शिरसगांव, इनामगांव, नलगे मळा, धनगरवस्ती सांगवी दुमाला हे पाचही बंधाऱ्यांचे ढापे काढले आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या