वडगाव रासाई नदीपाञालगत अाढळला मृतदेह

वडगाव रासाई, ता.९ अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) : येथील नदीपाञातलगत अनोळखी मृतदेह अाढळुन अाला अाहे.

या बाबत अधिक माहिती अशी कि,सोमवारी(ता.८)रोजी वडगाव रासाई येथील भीमानदीपाञालगत  स्थानिक ग्रामस्थांना एक अनोळखी मृतदेह अाढळुन अाला.या घटनेची माहिती पोलीसांना कळविल्यानंतर सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमोडे यांनी सहका-यांसह घटनास्थळी भेट देउन पाहणी केली.सदर मृतदेह हा पुर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने व दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने मृतदेह त्वरीत हलविणे गरजेचा असल्याने स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात अाला.तसेच घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह  शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात अाला.

भिमा नदीला नुकताच मोठा पुर अाल्याने नदी सध्या दुथडी भरुन वाहत अाहे.नदीपाञातील पुराचे पाणी ओसरल्याने सदर मृतदेह अाढळुन अाला असल्याचे स्थानिक  ग्रामस्थांनी या वेळी बोलताना सांगितले. 

तर सदर मृतदेह पुर्णपणे सडलेल्या अवस्थेत अाढळला असल्याने ओळख पटने हे अशक्य असुन सकृत दर्शनी महिलेचा मृतदेह असावा असा प्राथमिक अंदाज पोलीसांकडुन व्यक्त करण्यात अाला अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या