एटीएम मशीन चोरणा-या टोळीचा पर्दाफाश

रांजणगाव गणपती , ता.९ अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) : रांजणगाव एमअायडीसी मधील स्टेट बॅंकेचे   एटीएम मशिन फोडणाऱ्या टोळीचा रांजणगाव पोलीसांनी पर्दाफाश करत एका  अारोपीस अटक केली अाहे.

रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपुर्वी रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील भारतीय स्टेट बॅंक शाखेच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बॅंकेचे एटीएम फोडून त्यातील अठरा लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे रुपये चोरट्यांनी पळविले. ही घटना (ता.२९) जून रोजी घडली होती. एटीएम मशिन पळविण्यासाठी चोरट्यांनी एका पिक अप गाडीची चोरी केली होती. याप्रकरणी रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अशाच प्रकारे सरदवाडी (ता. शिरूर) येथून बॅंक ऑफ इंडिया व नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामरगाव चास येथे स्टेट बॅंकेचे एटीएम चोरीला गेल्याची माहिती माहिती पोलीसांना तपासात मिळाली.यावरुन अारोपी हे एकाच टोळीचे असल्याची पोलीसांना खाञी झाली. येथील घटनेतील चोरलेले एटीएम करडे घाटात फोडण्यात आले होते.

या प्रकरणी रांजणगाव चे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी पोलीस अधिक्षक जय जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र  मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान तीन वर्षांपूर्वी विशिष्ट हत्यारांचा वापर करून एटीएम फोडणारा राजस्थानमधील आरोपी शिरूर पोलिसांनी पकडला होता. तोच कारेगाव परिसरात काही दिवसांपासून वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्यावरील पोलिसांचा संशय बळावला.पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनानुसार  स.पो.नि.सुनिल क्षिरसागर, राजु मोमीन, चंद्रकांत काळे, मंगेश थिगळे, तुषार पंदारे, सहदेव ठुबे, विनायक मोहिते, प्रफुल्ल भगत, उद्धव भालेराव, अजय भुजबळ, शिवाजी अादींच्या पथकाने सहभाग घेत या घटनेचा बारकाईने तपास करून राजस्थानातील पाली जिल्ह्यातून बनवारीलाल मोहनलाल मीना (वय 27) यास अटक केली.तसेच  त्याच्याकडून पाच लाख रुपये हस्तगत करण्यात आले.

या प्रकरणी एका  अारोपीस अटक केली अाहे तर  या टोळीकडुन तीन ठिकाणचे गुन्हे उघडकिस अाले असुन इतर अारोपींना देखील लवकरच अटक  करण्यात  येइल अशी माहिती पोलीसांनी दिली.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या