हुताम्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवणे काळाची गरज

तळेगाव ढमढेरे ,  ता. १० अॉगस्ट २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून समर्थ भारताच्या निर्मीतीसाठी युवा पिढीने जागॄत रहावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे यांनी बोलताना केले.

तळेगाव ढमढेरे येथे अॉगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय व स्वातंञ्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागॄती फेरी व हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अरविंददादा ढमढेरे बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की क्रांतिकारकांच्या बलिदानातूनच हा देश उभा आहे म्हणून त्यांच्या बलीदानाचे विस्मरण होवू न देता प्रत्येकाने राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे.उपस्थित मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी हुतात्मा पिंगळे यांच्या पुतळयास मानवंदना दिली व अभिवादन केले.यावेळी सरपंच तार्इ सोनवणे, उपसरपंच राकेश भुजबळ, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, पोलीस पाटील पांडूरंग नरके, प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, डॉ.पराग चौधरी, डॉ.संदीप सांगळे, डॉ.पद्माकर गोरे, प्रा.दत्ता कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नव्या पिढीनेही अशा क्रांतिकारकांचे बलिदान व्यर्थ जाउ न देता त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेवून राष्ट्रनिर्मिती करण्याचे आवाहन यावेळी बोलताना विद्या बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या