शिक्रापूरातील ब्रिटीशकालीन पुलावरून वाहतुक बंद

शिक्रापूर ,  ता.१२ अॉगस्ट २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : संकेतस्थळ ‘शिरूर तालुकाकॉम’वर येथील ब्रिटिशकालीन पुलाचे वॄत्त प्रसिध्द होताच सार्वजनीक बांधकाम विभागाकडुन तातडीने अंमलबजावणी करत वेळ नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरून सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्यात  आली आहे.
सर्वप्रथम संकेतस्थळाने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

शिक्रापूर येथील वेळ नदीवर सुमारे 125 वर्षापूर्वीचा तीन कमानींचा पूल आहे.गेल्या तीन वर्षापासून या पुलावरील अवजड व मालवाहतुक बंद करण्यात आली होती मात्र आयुर्मान संपलेल्या या ब्रिटीशकालीन पुलावरून  चारचाकी मोटरगाडया व दुचाकींची वाहतुक सुरूच होती.शिरुर तालुक्याचे संकेतस्थळ www.shirurtaluka.com वर नुकतेच 'ब्रिटीशकालीन पुलाचे आयुर्मान संपले तरी वाहतुक सुरूच'या या मथळयाखाली वॄत्त प्रसिध्द झाल्यानंतर तातडीने या वॄत्ताची दखल घेवून सार्वजनीक बांधकाम विभागाने हा पुल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरीगेट्स लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला असून पर्यायी चाकण–शिक्रापूर–तळेगाव या राज्य मार्ग क्र.55 वरील रस्त्याचा व पुलाचा वापर करण्याचे आवाहन वाहतुकदार व नागरीकांना या फलकाद्वारे सार्वजनीक बांधकाम विभागाने केले आहे.वाहतुकीसाठी हा पुल बंद केल्याने नागरीकांना दुचाकी किंवा चारचाकी वरून जाताना व येताना चाकण चौकातून वळसा घेवून यावे व जावे लागणार आहे.मात्र सुरक्षेच्या दॄष्टिने हा पुल बंद होणे गरजेचेचे होते अशी नागरीकामध्येही चर्चा आहे.

नागरिकांनी संकेतस्थळाला  दिले धन्यवाद
परीसरातील नागरीकांनी संकेतस्थळ शिरूर तालुकाकॉम ला धन्यवाद दिले असून सार्वजनीक बांधकाम विभागानेही भविष्यातील धोका व संकट ओळखून तातडीने कार्यवाही केली हे देखील थोडे नाही अशी नागरीकांची भावना आहे.सार्वजनीक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला अडथळयासाठी कायमस्वरूपी लोखंडी खांब उभे केले आहेत. त्यामुळे नागरिक हा पुल सध्या फक्त दुचाकी व पादचारी मार्ग म्हणून वापरत आहेत.

चारचाकी वाहनांना  'नो एंट्री'
या पुलावर कायमस्वरुपी संरक्षक बॅरिकेट लावल्याने चारचाकी मोटारगाडयांची वाहतुक पूर्णपणे बंद झाली आहे.सार्वजनीक बांधकाम विभागाच्या या तातडीच्या निर्णयामुळे महाड येथील सावित्री नदीवर घडलेल्या दुर्घटनेसारखी पुनरावॄती निश्चितच टाळता येर्इल तसेच पुलाची डागडुजी व रंगरंगोटी करून पुलाचे सौंदर्यही अबाधित ठेवता येर्इल. त्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभाग व स्थानीक प्रशासनाने देखील या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या