कोल्हापुर पद्धतीचे बंधारे माञ दुर्लक्षितच...

सादलगाव, ता.१२  अॉगस्ट २०१६ (संपत कारकुड) : महाड दुर्घटनेनंतर खडबडुन जागे झालेल्या प्रशासनाने सर्वच नदीवरील जुने पुलांची पाहणी करुन उपाय योजना हाती घेतली असतानाच नदीवरील सिंचनाची म्हत्वाची भुमिका बजविणारे कोल्हापुर पद्धतीचे बंधारे मात्र दुर्लक्षित केले आहेत.


शेती सिंचनामध्ये म्हत्वाची भुमिका बजविणारे नदीवरील बंधारे अत्यंत कमी कालावधीमध्येच मोडकळीस आल्याचे चिञ समोर येत असून सादलगाव येथील बंधा-याची नुकत्याच आलेल्या पाण्याने झालेली अवस्था पाहिल्यावर लक्षात येते. सध्या बंधा-याच्या आयुर्मानावर मोठा परिणाम होत असून  याला प्रमुख कारण म्हणजे नदीमधील खोलवर केलेला वाळु उपसा हेच आहे. प्रशासन दरवर्षी नदीवरील वाळुचे भुखंड लिलावाद्वारे ठेकेदारांला देते. ठेका देताना फक्त कागदोपत्री अटी घालुन फार काळजी घेत असल्याचे भासवून आपली भुमिका पार पाडल्याचा आव आणते.

परंतु नदीतील वाळुउपशामुळे नदीच्या भौगोलिक परिस्थीमध्ये जो मोठा बदल होत आहे तो दुर्लक्षित केला जात आहे. वाळु ठेकेदारांकडुन नदीला जन्मजात लाभलेले नैसर्गिक अडथळे उदवस्त केले जात असून नदीचा प्रवाह व त्याच्या दाबावर मोठा परिणाम झाल्याचे निदर्शनास येते आहे. सादलगाव बंधा-याच्या 44 वी मोरी निखळण्याचे हे प्रमुख कारण आहे. जेमतेम वीस वर्षांपुर्वी बांधकाम केलेल्या या बंधा-याची स्थिती अत्यंत धोकादायक होत चालली असून प्रशासन येथे महाडसारखी दुर्घटना घडेपर्यंत वाट पाहणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडुन होत आहे.

हे सर्व त्यावर नियंत्रण ठेवण्या-या यंत्रणेला दिसूनही ते मात्र अांधळयाची भुमिका बजावित आहे. बंधा-याच्या आजुबाजुला किमान 100 मीटरवर वाळु अथवा इतर उत्खनन करु नये, असे केल्यास तत्काळ लिलाव थांबविण्याचे आदेश द्यायला हवेत. परंतु प्रशासन तसे करताना दिसत नाही. गेली अनेक वर्षांपासुन प्रशासनाने दिलेल्या वाळु उपशामुळे नदीची रचनाच बदलुन गेली असून याचा काही ठिकाणी मानववस्तीला धोकाही निर्माण झाला आहे. हा सर्व घडामोडी लक्षात घेवून त्याप्रमाणे ताबडतोब अंमलबजावणी करण्याची गरज असून प्रशासनाने आता शेतक-यांना वरदान ठरलेल्या बंधा-याकडेही लक्ष देण्याची गरज अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या