वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी तिघे अटकेत

शिरूर, ता.१० अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) :  शिरूर न्यायालयातील वकिल अॅड. विकास दत्तात्रय कुटेयांना बेदम मारहाण  केल्याप्रकरणी वकीलासह तिघांना शिरूर पोलिसांनी अटक केली.

 अॅड. विशाल वीर, हरिभाऊ वीर व नानू कुर्लप अशी अटक केलेल्या अारोपींची नावे अाहेत. यंच्यासह इतर पाच ते सहाजणांवर बेकायदा जमाव जमवून हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अॅड.विकास  कुटे व अॅड.विशाल वीर हे शिरूर न्यायालयात अॅड. नारायण पवार यांच्याकडे "प्रॅक्‍टिस' करतात. काहि दिवसांपुर्वी महाविद्यालयीन विद्यार्थिनीला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शंतनू महेंद्र मल्लाव याच्या जामीनाची केस अॅड. पवार यांच्याकडे आहे.त्या केसचे कामकाज चालू असताना तीन ऑगस्टला वीर यांनी मल्लाव याचा जामीन नामंजूर झाल्याचे कुटे यांना सांगितले. याबाबत कुटे यांनी, दुसऱ्या दिवशी अॅड. पवार यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी "ही माहिती तुला कुणी दिली', असे विचारले. वीर यांनी ही माहिती दिल्याचे कुटे यांनी त्यावेळी सांगितले. त्यावर अॅड. पवार यांनी दोघांनाही न्यायालयातील आपल्या कार्यालयात बोलावून विचारणा केली असता, त्या दोघांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. तेव्हा अॅड.नारायण पवार यांनी वीर याला कार्यालयातून बाहेर काढून दिले.

या कारणावरून चिडलेल्या वीर याने हरिभाऊ वीर व नानू कुर्लप यांच्यासह (ता.10) ऑगस्ट ला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास न्यायालयाच्या आवारातच कुटे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली व धमकी दिली.दरम्यान या वेळीच इतर वकिलांनी हस्तक्षेप करत ही भांडणे सोडवली. तेव्हा अॅड.पवार यांनी बार असोशिएशन मध्ये याबाबत मुद्दा उपस्थित करु असे सांगितले होते.

दरम्यान, कुटे हे शुक्रवार(ता.१२)रोजी सायंकाळी शिरुर येथील आडत बाजार परिसरात कपडे शिवायला टाकण्यासाठी आले असता, अॅड.वीर, हरिभाऊ वीर व कुर्लप यांच्यासह पाच ते सहाजणांनी कुटे यांना  मारहाण केली. हा भर बाजारात चाललेला मारहाणीचा प्रकार शिरुर पोलीसांना कळताच दोन पोलिस कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.या मारहाण प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मनोज नवसरे हे करीत आहेत.

कठोर कारवाई करा
अारोपी हे गुंडगिरी प्रवृत्ती चे असल्याने यांवर कठोर करवाई व्हावी अशा  प्रतिक्रिया जनतेतुन उमटत अाहेत.या पुर्वी यातील काहिंवर तक्रारी दाखल अाहेत.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या