यशासाठी जिद्द अत्यावश्यक :रमेश गलांडे

तळेगाव ढमढेरे ,  ता.१३ अॉगस्ट २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, मात्र अपार कष्ट करण्याची तयारी व जिद्द युवकांच्या अंगी असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी केले

तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात जागतिक युवक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून पोलिस निरीक्षक गलांडे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे होते.

यावेळी बोलताना गलांडे पुढे म्हणाले की आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकजण गोंधळलेल्या अवस्थेत मार्गक्रमण करत आहे.मात्र शिक्षणच ख-या अर्थाने प्रत्येकाला यशाचा मार्ग हमखास दाखवते.महाविद्यालयीन युवतींनी कुठल्याही संकटाचा सामना धैर्याने केला पाहीजे.पोलीस प्रशासन सातत्याने विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेच्या दॄष्टिने अग्रेसर व जागरूक असल्याचेही यावेळी बोलताना त्यांनी सांगीतले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संस्काराचे धडे दिले जातात.या संस्कारातून उद्याचा आदर्श नागरीक निर्माण व्हावा अशी अपेक्षा यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात महेश ढमढेरे यांनी व्यक्त केली.या प्रसंगी महाड दुर्घटनेतील मॄतांना आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप भक्त, कॉन्स्टेबल आनंदा भाटे, अॅड.राजेश भुजबळ, प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संदीप सांगळे, डॉ.पद्माकर गोरे, प्रा.दत्ता कारंडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदीप सांगळे यांनी केले तर प्रा.दत्ता कारंडे यांनी सुत्रसंचालन केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या