विशेष मुलांच्या शाळेत स्वातंञ्यदिन उत्साहात साजरा

शिरूर, ता.१६ अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) : येथील अाकांक्षा स्पेशल चाईल्ड एज्युकेशन मध्ये प्रथमच स्वातंञ्यदिन उत्साहात साजरा करण्यात अाला.

सकाळीविविध क्षेञातील मान्यवरांच्या उपस्थितीत अादेश गुंदेचा यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात अाले.यानंतर दत्ताभाउ केदारी यांनी प्रास्ताविक केले.संस्थेच्या अध्यक्षा राणीताई चोरे यांनी प्रारंभी संस्थेविषयी थोडक्यात माहिती देउन संस्था उभारणीला मदत करणा-या सर्वच दात्यांचे या वेळी अाभार मानले.

अादेश गुंदेचा यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना, या संस्थेने सुरु केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल संस्थेचे विशेष कौतुक करुन संस्थेला या पुढील काळात देखील सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे उपस्थितांना सांगितले. डॉ.चोरे व इतर  मान्यवरांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाउ वाटप करण्यात अाले.प्रथमच राष्ट्रिय सण संस्थेत साजरा होत असल्याने निरागस बालकांच्या चेह-यावर वेगळाच अानंद दिसत होता.

या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष नितीन चोरे,डॉ.मनिषा चोरे, अादेश गुंदेचा मिञपरिवार, एस.एस.वाय चे सदस्य, पालक, विद्यार्थी  व विविध क्षेञातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्ता केदारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

रोटरी क्लब ची भेट
रोटरी क्लब अॉफ नगररोड चे संचालक व बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, संचालक दिपक वाणी तसेच रोटरी क्लब च्या पदाधिका-यांनी या वेळी स्वातंञ्यदिनाचे अौचित्य साधुन संस्थेस  भेट दिली.अाकांक्षा या संस्थेचे सुरु असलेले अादर्शवत कार्य पाहुन उपस्थित पदाधिकारी भारावुन गेले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या