शिंदोडी सोसायटीत घडयाळाचीच टिकटिक

शिंदोडी ,  ता.१६ अॉगस्ट २०१६( तेजस फडके) : येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी संघर्ष परिवर्तन पॅनल व जय हनुमान सहकार पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी संघर्ष परिवर्तन पॅनलने १३ पैकी १० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत एकहाती सत्ता मिळवल्याने घड्याळाची टिकटिक पुन्हा एकदा सुरु झाली

शिंदोडी विविध कार्यकारी सोसायटीच्या सन २०१६ - २०२१ च्या पंचवार्षिक निवडणुकीत एकुण ३० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १ अपक्ष उमेदवार होता. शेतकरी संघर्ष परिवर्तन पॅनलचे प्रचार प्रमुख म्हणुन विकासोचे माजी अध्यक्ष इंद्रभान ओव्हाळ, संपत वाळुंज, ग्रा पं सदस्य एकनाथ  वाळुंज, योगेश विठ्ठल ओव्हाळ यांनी काम पाहिले. तर जय हनुमान सहकार पॅनलचे
प्रचार प्रमुख म्हणुन माजी सरपंच रंगनाथ वाळुंज, माजी पोलीस पाटील बबनराव खेडकर , उपसरपंच दौलत शितोळे यांनी काम पाहिले.

दोनही पॅनलच्या प्रमुखांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन जोरदार प्रचार केला होता.त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. उपसरपंच दौलत शितोळे हे शिरुर - हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक असुन ग्रा पं सदस्य एकनाथ वाळुंज हे माजी आमदार अशोक बापु पवार यांचे कट्टर समर्थक आहेत.त्यामुळे या निवडणुकीवर संपुर्ण शिरुर तालुक्यातील राजकीय पुढा-यांच लक्ष लागलं होत.

रविवारी(ता.१४) रोजी शिंदोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान झाले. त्यात ५११ मतदारांपैकी ५०० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये शेतकरी संघर्ष परिवर्तन पॅनलचे १३ पैकी १० तर जय हनुमान सहकार पॅनलचे ३ उमेदवार निवडुन आले.

आमदार बाबुराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक दौलत खेडकर पाटील हे इतर मागासवर्गीय मतदार संघातुन निवडणुक लढवत होते. कल्पना शिवाजी ओव्हाळ यांनी त्यांचा पराभव केला.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या