पुंडे कुटुंबियांकडुन वृक्षसंवर्धनासाठी संरक्षक जाळ्या

कान्हूर मेसाई , ता.१७ अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) : येथे माजी जि .प. सदस्य फक्कडदादा पुंडे पाटील  यांच्या प्रथम स्मरणार्थ जि.प. प्राथमिक शाळेस वृक्ष संरक्षणा साठी पुंडे कुटुंबियातर्फे वृक्षसंवर्धनाकरिता  ३० संरक्षक जाळ्या नुकत्याच भेट म्हणुन देण्यात अाल्याची माहिती मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष भास्कर पुंडे यांनी दिली.

स्वातंञ्यदिनी या संरक्षक जाळ्यांचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम साजरा  करण्यात आल्या.

यावेळी जि.प.सदस्य भाऊसाहेब शिंदे , सरपंच सविताताई रामकृष्ण पुंडे, उपसरपंच अनिल शेठ गोरडे, सेना नेते दादासाहेब खर्डे, शहाजी दळवी,शाले़य व्यवस्थापन समीती चे आबिदभाई ताबोळी,ऊपाध्यक्ष  प्रमोद दळवी, ग्रामपंचायत सदस्य,  शिक्षक तसेच सर्व ग्रामस्थ या वेळी मोठ्या प्रमाणात  ऊपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या