शिक्रापुरात चाकूच्या धाकाने लुटणा-या तिघांना अटक

शिक्रापूर ,  ता.१८ अॉगस्ट २०१६ (शेरखान शेख) : प्रवासी व नागरिकांना रात्रीच्या वेळेस चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून लुटणाऱ्या पेरणे फाटा येथील तीन जणांना अटक करण्यात शिक्रापूर पोलिसांना  यश आले आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रीच्या वेळेस लुटमार, चोऱ्या यांचे प्रमाण वाढत चालले असून काल रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास पुणे नगर रस्त्यावर तिघा जणांनी (एम एच १२ एम झेड २८१०) या मोटारसायकल वरून येत चाकूचा धाक दाखवून श्रावण तुळशीदास वानखेडे यांचा मोबाईल आणि काही रोख रक्कम काढून त्यांच्या जवळील मोटार सायकलवरून पळून गेले. याच वेळेस शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, संतोष पवार हे रात्र गस्त साठी पुणे नगर रस्त्यावरून जात असताना भेदरलेल्या अवस्थेतील वानखेडे यांनी पोलिसांना घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

यावेळी पोलिसांनी आरोपी दुचाकीवरून गेलेल्या ठिकाणी पाठलाग केला असता पोलिसांना पाहून आरोपी पळून जाऊ लागले. यानंतर पोलिसांनी मोटारसायकल सोडून पळून जात असलेल्या अमोल प्रकाश सोनवणे (वय–२१), रोहन महेश परदेशी (वय–२०) रा. पेरणे फाटा ता. हवेली यांना पकडले. यावेळी यांच्यातील विजय ज्ञानेश्वर पवार हा पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर काही वेळाने पोलिसांनी विजय पवार यास पेरणे फाटा येथून ताब्यात घेत त्यांच्याकडील चोरलेला मोबाईल व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चाकू देखील हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत श्रावण तुळशीदास वानखेडे रा. अंबिकानगर सणसवाडी ता. शिरूर जी. पुणे मुळ राहणार केनवड ता. रिसोड जी. वाशिम यांनी फिर्याद दिली असून अमोल प्रकाश सोनवणे, रोहन महेश परदेशी, विजय ज्ञानेश्वर पवार तिघे रा. पेरणे फाटा ता. हवेली जि.पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून या आरोपींकडून अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पाटील हे करत आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या