जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश निश्चित- अशोक पवार

मांडवगण फराटा,  ता.२० अॉगस्ट २०१६ (राजेंद्र बहिरट) : जिदद् आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते असे  मत माजी आमदार अशोक पवार यांनी बोलताना व्यक्त केले.

मांडवगण फराटा येथील वसंतराव फराटे महाविदयालय व फार्मसी कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये शिरूर चे माजी आमदार अशोक पवार बोलत होते.

या वेळी बोलताना ते  म्हणाले की, यापूर्वी ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना उच्च  शिक्षणासाठी शहरी भागात जावे लागत होते. पण आता  शहरातील विविध संस्थेच्या माध्यमातून  त्या संस्था  ग्रामीण भागामध्ये विविध प्रकारचे नवनवीन अभ्यासक्रम विदयार्थ्यांना  उपलब्ध करून देना-या त्या संस्था ग्रामीण भागात आता कार्यरत झाल्या आहेत असे सांगितले. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या विठ्ठल उदमले याचा सत्कार पवार यांच्या हस्ते  करण्यात आला.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे, घोडगंगा कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे, जगन्नाथ फराटे, बाळासाहेब फराटे, माणिकअण्णा फराटे, संभाजी फराटे गणेश फराटे, पंडीतराव फराटे, शंकर फराटे, शरद चकोर, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे, प्राचार्य डॉ.ए.ए बारवकर, उपप्राचार्य एस एस कोकरे  पवार पब्लीकेशन स्कूलच्या प्राचार्या धनश्री  फराटे तसेच महाविदयालयाचे सर्व शिक्षक कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या