राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शिक्रापूरच्या खेळाडूंचे यश

तळेगाव ढमढेरे ,  ता.२१ अॉगस्ट २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शिक्रापूर येथील शोतोकॉन कराटे अकादमीच्या खेळाडूंनी 9 सुवर्ण, 12 रौप्य तर 13 कांस्य पदके पटकावून घवघवीत यश संपादन केले.

शोतोकॉन ग्लोबल जपान कराटे अॅकॅडमीच्या वतीने आयोजित चौथ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील शिक्रापूरचे विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : – कराटे कुमेती प्रकार : दिप्ती पिंपरकर, नेहा भांडवलकर, रोहन पिंपरकर, यशराज इंगळे(सुवर्ण पदक), पायल गुंडाळ, साहील जाधव, अभिजीत पानसरे, सिध्देश लांडगे, गणेश दाते(रौप्य पदक), नमीरा मुल्ला, अंकीता भुजबळ, गायत्री दाभाडे, धनश्री गुंडाळ, आदीत्य बो-हाडे(कांस्य पदक).कराटे काता प्रकार : पायल गुंडाळ, आदीत्य बो-हाडे, ओम पांढरकर, गणेश दाते, रोहन पिंपरकर(सुवर्ण पदक),मोहीनी आघाव, मानसी भुजबळ, कार्तिक सासवडे, अभिजीत पानसरे, सिध्देश लांडगे, विनायक शिंदे, सोमनाथ अभंग(रौप्य पदक), दिप्ती पिंपरकर, गायत्री दाभाडे, नेहा भांडवलकर, पॄथ्वीराज तांबे, ऋषिकेश दाते, साहील जाधव, यशराज इंगळे, अक्षय गोठे(कांस्य पदक).

सर्व विजेत्या खेळाडूंना सोमनाथ अभंग यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे कराटे वल्र्ड फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम चव्हाण, शरद फंड, मच्छिंद्र खैरनार, संजय शिंदे, युवा उद्योजक मंगेश सासवडे, शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला यांनी अभिनंदन केले अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या