रांजणगाव पोलीसांची राजस्थानमध्ये 'दबंग'कारवाई

रांजणगाव गणपती , ता.२४ अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन चोरी प्रकरणातील अाणखी दोन आरोपींना राजस्थानहून ताब्यात घेण्यात अाल्याची माहिती रांजणगाव पोलिसांनी दिली अाहे.
 
गेल्या जून महिन्यात  रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन चोरून नेऊन त्यातील सुमारे 18 लाख 87 हजार 600 रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. या चोरी प्रकरणातील मुख्य सुञधारास रांजणगाव पोलिसांनी (ता.5) ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले असता पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाख रुपये हस्तगत केले होते. व  त्यानंतर मागील आठवड्यात पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनानुसार एक पथक पुन्हा राजस्थानला रवाना झाले

चोरी प्रकरणातील उर्वरीत दोन आरोपींना राजस्थानमध्येच ताब्यात घेण्यात रांजणगाव पोलीसांना यश आले अाहे.

मंगलचंद लक्ष्मीनारायण चौधरी (वय 28, रा. बाजीयोगीठाणी ता. फुलोरा, जि. जयपूर) याला रेनवाल या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले, तर अरुण ऊर्फ नागा मुंगदास शर्मा (वय 32 रा. पाचाड ता.दातार,जि.सिकर) याला रामगड येथून ताब्यात घेण्यात आले

राजस्थान मध्ये जाउन कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरीक्षक सुनील क्षीरसागर, राजू मोमिन, तुषार पंधारे, चंद्रकात काळे, विनायक मोहिते, मंगेश थिगळे, सहदेव ठुबे आदींनी सहभाग घेतला.

सदर आरोपींना 21 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 तारखेपर्यंत  पोलिस कोठडी दिली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील क्षीरसागर करत आहेत.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या