नगरपरिषद प्रशासकिय इमारतीसाठी २ कोटी ५० लाख

शिरूर, ता.२४अॉगस्ट २०१६ (सतीश केदारी) : शिरुर नगरपरिषदेच्या प्रशासकिय इमारतीच्या कामासाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती अामदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.

शिरुर नगरपालिकेच्या प्रशासकिय इमारतीच्या भुमिपुजन प्रसंगी विजय दुगड यांनी पालकमंञी गिरीष बापट यांच्याकडे विद्युतीकरण व अन्य कामांसाठी पाच कोटी रुपयांच्या विकास निधी ची मागणी केली होती.त्याचप्रमाणे सभागृह नेते प्रकाश धारीवाल व नगरपालिका सदस्यांनी या साठी पालकमंञी व अामदार पाचर्णे यांना भेटुन वेळोवेळी पाठपुरावा केला. तर पालकमंञी गिरिष बापट यांनी देखील नवीन प्रसासकिय इमारतीची पाहणी करुन झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रशासकिय इमारती च्या उर्वरित कामांसाठी केलेल्या निधी च्या मागणी  चा विचार करत अामदार पाचर्णे यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला असता मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत शासनाच्या वैशिष्ट्यपुर्ण योजनेंतर्गत नवीन इमारतीच्या विद्युतीकरण व इलेक्ट्रॉनिक्स खरेदी साठी १कोटी ५० लाख व विशेष रस्ते अनुदानातुन परिसर विकसित करणासाठी १ कोटी असा एकुण मिळुन २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात अाला असल्याची माहिती अामदार पाचर्णे यांनी दिली. 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या