शिंदेवाडीतील त्या बालकांना 'एपिडेमिक टायफस'?

मलठण , ता.२५ अॉगस्ट २०१६ (सतीश केदारी ) : गोचिडांपासून फैलावणाऱ्या "एपिडेमिक टायफस' या आजाराचे देशातील पहिले रुग्ण मलठण येथील शिंदेवाडी येथे आढळले असल्याचा संशय व्यक्त केला जात असुन या दुर्मिळ आजाराची लक्षणे असणाऱ्या सहा लहान मुलांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असुन रुग्णांचा देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समजते.

शिंदेवाडी येथे गेल्या वीस दिवसांपुर्वी दोन लहान मुलांचा अचानक ताप येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर याच भागातील 22 लहान मुले तापाने फणफणली होती. त्यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वेगवेगळ्या आजारांच्या चाचण्या करूनही तापाचे निश्‍चित कारण समजू शकले नसल्याने या बाबत गुढ अाणखीनच वाढले होते. त्यामुळे त्यांची वेलफिलिक्‍स ही तापाच्या रोगनिदानाची प्राथमिक चाचणी करण्यात आली. त्या चाचणीच्या अहवालातून हा "एपिडेमिक टायफस' असल्याचा प्राथमिक अंदाज बी. जे. वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

या संदर्भात ससुन अभ्यागत समिती सदस्या डॉ.वर्षा शिवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि,हा अाजार जनावरांच्या अंगावर बसणा-या गोचिडांपासुन फैलावणारा अाहे. त्याचप्रमाने ससुन रुग्णालयातर्फे योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात असुन सर्वच रुग्णांची परिस्थिती स्थिर  अाहे.

दरम्यान या रुग्णांसाठी ससुन रुग्णालयात  विशेष वॉर्ड ची सोय करण्यात अाली अाहे.शिंदेवाडीत देखील भेट दिली असुन नागरिकांनी घाबरुन न जाता अारोग्य खात्याने दिलेल्या सुचनांचे पालन करुन खबरदारी घेण्यात यावी असे त्यांनी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या