कांदयाच्या पाठोपाठ टोमॅटोनेही शेतक-यांना रडविले!

मांडवगण फराटा , ता.२५ अॉगस्ट २०१६ (राजेंद्र बहिरट ) : बाजाराच्या आशेने कांदा वखारीत साठून ठेवला मात्र तोही सडून गेला व  रोगराइपासून टोमॅटोचे पिक वाचवण्यासाठी शेतकरयांनी लाखो रूपये खर्च केले मात्र बाजारभाव योग्य मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी आर्थीक संकटात सापडला आहे.

कर्ज काढून शेतातील पिके चांगली जोमात आणली मात्र बाजारचं नसल्यामुळे पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ शेतक-यांवर आली अाहे.  मांडवगण फराटा व परीसरामध्ये शेतक-यांनी केलेल्या शेतातील फळभाज्यांना व पालेभाज्यांना बाजारभाव नसल्यामुळे शेतकरीवर्ग  चिंताग्रस्तेत पडला आहे. मध्यंतरी टोमॅटोला ब-यापैकी बाजारभाव होता  म्हणून मांडवगण फराटा परीसरातील अनेक शेतकरयांनी टोमॅटो पिकाची लागवड केली. लाखो रूपये खर्च करून टोमॅटो पीक जोमात आणले. मात्र सध्या टोमॅटोचा बाजारभाव अचानक कोसळल्यामुळे शेतक-याच्या हाती फक्त निराशाचं आली आहे.

मांडवगण फराटा, वडगाव रासार्इ, सादलगाव ,बाभूळसर बुद्रूक, इनामगाव, पिंपळसुटी ,गणेगाव दुमाला, शिरसगाव काटा, तांदळी या परीसरातील शेतक-यांनी कांदा वखारीमध्ये साठवणूक केली होती. परंतू सतत होणा-या हवामानाच्या बदलामुळे वखारीतील कांदा सडून गेला आहे व तोच कांदा आता ज्या शेतातून काढला होता त्या शेतात टाकण्याची  वेळ शेतक-यांवर आली आहे.

मांडवगण फराटा येथील शेतकरी सुनील जगताप यांच्या वखारीतील कांदा सडला असल्यामुळे त्यांनी  कांदयाला केलेला खर्च तर सोडा पण त्यांची मजूरांची रोजंदारी देखील निघाली नाही. तसेच संभाजी चकोर यांनी टोमॅटोच्या पिकाला औषध फवारणी व इतर मेाठा खर्च केला पण सध्याच्या बाजारभावामध्ये त्यांचा खर्च निघणे अवघड झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 त्यामुळे टोमॅटो  व कांदा या दोन पिकांना शेतक-यांनी चांगला खर्च केला  परंतू  तरीदेखील शेतक-यांच्या हाती केवळ निराशाचं आल्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडत चालला आहे. 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या