दुर्लक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणणे स्तुत्य उपक्रम-गावडे

शिरूर, ता.२७ अॉगस्ट २०१६ (सतीश केदारी) :  शिक्षणापासुन नेहमीच दुर्लक्षित गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणण्यासाठी सुरु केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी 'अाकांक्षा' या विशेष मुलांच्या संस्थेस  भेट देताना व्यक्त केले.

शिरुर तालुक्यात रामलिंग रोडलगत विशेष बहुविकलांग मुलांसाठी सुरु केलेल्या अाकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कुल या संस्थेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, महिला अघाडी च्या जिल्हा संघटक श्रद्धाताई कदम, संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे, रमेश सोनवणे, संजय देशमुख, तालुका संघटक विजया टेमगिरे अादी शिवसेनेचे जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा राणीताई चोरे यांनी संस्थेची व विशेष मुलांची ओळख करुन दिली.

या वेळी बोलताना गावडे म्हणाले कि, शिरुर तालुक्यात प्रथमच अागळ्या वेगळ्या व विशेष मुलांसाठी सुरु केलेली शाळा चालवणे हे मोठे अाव्हाण अाहे. वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणणे,त्यांना प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर पालकांचे देखील समुपदेशन करणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम अाहे.

या वेळी उपस्थित पदाधिका-यांनी शाळेतील शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या