नवविवाहितेची गळफास घेउन अात्महत्या

कारेगाव, ता.२७ अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) : येथे नवविवाहितेने सासरच्या छळास कंटाळुन अात्महत्या केल्याची घटना घडली अाहे.या प्रकरणी विवाहितेच्या  वडिलांनी फिर्याद दिली अाहे.

अश्विनी कांबळे(वय  असे अात्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव अाहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा पती प्रशांत उर्फ लखन कांबळे, दिर परसु श्रावण कांबळे, सासु सुरेखा श्रावण कांबळे, यांनी लग्नानंतर साधारणत: महिनाभरात विवाहितेला लग्नात मानपान,पोशाख  केला नाहि, फ्रिज दिला नाहि, अादी कारणांवरुन शारिरिक व मानसिक छळ केला.या नेहमीच्या ञासाला कंटाळुन अश्विनीने (ता.२१) रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेउन अात्महत्या केली.

दरम्यान विवाहितेचे वडील सत्यवान जालिंदर शिंदे(रा. साईनाथनगर,थेरगाव,पुणे) यांनी दिलेल्या तक्रारी वरुन मयत अश्विनी हिचा पती, दिर,नंनद यांना अटक केली असुन सदर अारोपी हे येरवडा कारागृहात अाहेत.तसेच उर्वरित अारोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

या प्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर हे पुढील तपास करत अाहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या