वडगाव रासाई त उद्या 'जल्लोष दहिहंडीचा'

वडगाव रासाई, ता.२८अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) : येथे शिवराय सांस्कृतिक कला क्रिडा मंच च्या वतीने भव्य दहिहंडी सोहळ्याचे अायोजन केल्याची माहिती सार्वजनिक दहिहंडी उत्सव समिती चे अध्यक्ष सचिन शेलार यांनी दिली.

या संदर्भात सचिन शेलार यांनी माहिती देताना सांगितले कि,वडगाव रासाई येथील शिवराय सांस्कृतिक कला क्रिडा मंच हे गेल्या अनेक वर्षांपासुन सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विधायक उपक्रम राबवत अाहेत.सालाबादप्रमाणे या हि वर्षी भव्य दहिहंडी महोत्सवाचे अायोजन केले असुन विजेत्या संघास करंडक तसेच १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख बक्षिस ठेवले अाहे.तरुण व अाबालवृद्धांसाठी संगीताचा व  कलाकारांच्या संचाचा बहारदार कार्यक्रम ठेवला अाहे.

या दहिहंडी कार्यक्रमास जिल्हयासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार असुन  परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती शिवराय सांस्कृतिक मंचाच्या वतीने करण्यात अाली अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या