नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची हत्या

शिरूर, ता.२८ अॉगस्ट २०१६ (प्रतिनीधी) : शिरुर येथील कॉंग्रेस चे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात मल्लाव यांचा जागीच मृत्यु झाला.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर नगरपालिकेतील निवृत्त कर्मचारी बाळासाहेब काळे यांच्या अंत्यविधीवरून मल्लाव आपल्या दुचाकी गाडीवरून परत येत होते. त्या वेळी भरदुपारी दोन वाजता राम आळी परिसरातील भरबाजारपेठेत चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले.या हल्ल्यात महेंद्र मल्लाव हे  जागीच जखमी अवस्थेत पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या वेळी भरगर्दीत अचानक झालेल्या हल्ल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.या वेळी नागरिक काहि काळ गोंधळुन गेले.

नगरसेवक मल्लाव यांच्या हत्येची वार्ता वा-यासारखी तालुकाभर पसरताच नागरिकांमधुन अनेक तीव्र  प्रतिक्रिया उमटु लागल्या होत्या.त्यामुळे या घटनेचे शहरभर  नागरिकांनी तातडीने दुकाने बंद केेले.त्यामुळे काही मिनिटांतच संपूर्ण शहर बंद झाले. शिरुर शहरात काल  संचारबंदीसारखे वातावरण  निर्माण तयार झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांकडुन हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. पोलिस निरीक्षक दयानंद गावडे  हे आपल्या कर्मचार्‍यांसह तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली. परंतु, आरोपी सापडले नाहीत. दरम्यानच्या काळात प्रचंड जमाव घटनास्थळी जमा झाला होता. या तणावाच्या स्थितीतच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पार पाडला.
 
संतप्त जमावाने मल्लाव यांचा मृतदेह असलेल्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे सांगितल्याने मोठा तणाव काहिकाळ निर्माण झाला होता.  या हत्येप्रकरणी महेंद्र मल्लाव यांचे पुतणे गणेश जयसिंग मल्लाव यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राम आळी-कपडे बाजार रस्त्यावर महेंद्र हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 12 एलएच 1269) चालले असताना अज्ञात हल्लेखोरांनी मल्लाव यांच्यावर भरदुपारी  कोयत्याने, सत्तूरने सपासप वार केले. घटनास्थळी जमाव वाढत असल्याचे लक्षात येताच, हे सर्वजण दुचाकीवरून पळून गेले.


महेंद्र मल्लाव यांचा खून झाल्यानंतर शहरातील वातावरण अतिशय तणावपूर्ण झाले. रूग्णालयामध्ये गेलेला जमाव, तसाच शिरूर पोलिस ठाण्याकडे वळला. जमावाने पोलिस ठाण्याची तोडफोड केली. पोलिस ठाण्यातील संगणक फोडून टाकला. आतील केबिनच्या काचा फोडून टाकल्या. या संतप्त जमावाने पोलिस गाडीही उलटून टाकली. यामुळे या गाडीचेही मोठे नुकसान झाले. या संतप्त जमावाने काही काळ रास्ता रोकोही केला. महेंद्र मल्लाव यांच्या मुलावर 25 जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
 
तर या गुन्ह्यातील इतर तीन आरोपी जामिनावर सुटलेले होते. मात्र, येरवडा तुरुंगात असलेल्या मल्लाव यांच्या मुलाला अद्यापपर्यंत जामीन मिळालेला नाही. त्याला जामीन न मिळाल्यामुळे महेंद्र मल्लाव यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र पोलिस ठाण्यामध्ये देण्यात आले होते. परंतु पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी जाणिवपूर्वक मल्लाव यांच्या मुलाला जामीन मिळणार नाही, अशी व्यवस्था केल्याचा आरोप मल्लाव यांच्या संतप्त नातेवाईकांनी या वेळी केला.  

तर काहि दिवसांपुर्वी मल्लाव यांनी वाढदिवस साजरा करण्यास विरोध केल्याने आरोपींनी वरील कृत्य केल्याचा संशय फिर्यादीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
 
हा प्रकार समजताच, तालुक्याचे आमदार बाबूराव पाचर्णे, शिरूर नगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश धारीवाल, माजी आमदार अशोक पवार यांनी जमावाकडे येऊन या संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल, असे त्यांनी जमावाला आश्‍वासन दिले. त्यानंतर जमाव तेथून निघून गेला. पोलिस ठाण्याची प्रचंड मोडतोड झाल्यानंतर त्या परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
 
घटनेची माहिती समजताच सायंकाळी उशिरा अप्पर पोलिस अधिक्षक तानाजी चिखले, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी शिरूर पोलिस ठाण्याला भेट देऊन पाहणी केली. अारोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात अाली अाहेत.

नगरसेवक महेंद्र मल्लाव हे शांत स्वभावाचे म्हणुन परिसरात प्रसिद्ध होते.त्यांचा शिरुर शहरात सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा.त्यांच्या निधनाच्या वृत्ताने शिरुर शहर सह तालुकाभर दु:ख व्यक्त करण्यात येत अाहे.

वाचकांची संकेतस्थळावर गर्दी,तीव्र प्रतिक्रिया व्यक्त


शिरुर चे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्येचे वृत्त जिल्हाभर वा-यासारखे पसरताच, शिरुर तालुक्याचे पाच वर्षांपासुन सुरु असलेले संकेतस्थळ
www.shirurtaluka.com वर वाचकांनी एकच गर्दी केली.शांत स्वभावाचे म्हणुन परिचित असलेल्या मल्लाव यांचा तालुकाभर सर्वसामान्यांमध्ये 'गोरगरिबांचा नेता' म्हनुन ओळख होती.या वेळी वाचकांनी तीव्र शब्दांत भावना संकेतस्थळावर व्यक्त केल्या अाहेत.
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या