रांजणगावात शुक्रवारपासून महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन

रांजणगाव गणपती, ता.१ सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपतीचे येत्या शुक्रवारपासून (ता. 2) भाविकांना मुक्तद्वार दर्शन मिळणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. संतोष रामा दुंडे  यांनी दिली.

पुणे नगर  महामार्गालगत असणा-या अष्टविनायकांपैकी एक प्रमुख समजल्या जाणा-या रांजणगाव येथील महागणपती च्या दर्शनासाठी  गणेशोत्सवानिमित्त भाविकांची राज्यभरातुन मोठी गर्दी होत असते.

रांजणगाव गणपती येथे शुक्रवार ते सोमवार (ता. 5) पर्यंत पहाटे तीन ते सायंकाळी सहापर्यंत मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून भाविकांना दर्शनाचा लाभ मिळनार अाहे.

या सुरु होत असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. 8) रोजी होणार असुन याञाकाळात सुसज्ज दर्शनबारी, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रशस्त पार्किंग व्यवस्था आदी विविध सुविधा ट्रस्टतर्फे उपलब्ध केल्या जाणार अाहेत. भाद्रपद गणेशोत्सव काळात मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असून, तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, ट्रस्टचे पदाधिकारी, कर्मचारी व पुजारी आदींनी या बाबत चोख नियोजन केले आहे.

द्वारयात्रा निघनार पालखीतुन
पारंपारिक रुढीप्रमाने रांजणगावात  या गणेशोत्सव काळात श्री महागणपतीच्या चारही दिशांना असलेल्या बहिणींना आणण्यासाठी पालखीद्वारे द्वारयात्रा काढली जाते. त्यानुसार शुक्रवारी (ता. 2) सकाळी तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनानंतर 11 वाजता पालखी पूर्वद्वार यात्रेकरिता करडे गावाकडे प्रस्थान करणार आहे. शनिवारी (ता. 3) रोजी सकाळी 10 वाजता पालखी दक्षिणद्वार यात्रेकरिता निमगाव म्हाळुंगी गावाकडे प्रस्थान करेल. तसेच रविवारी (ता. 4) सकाळी 10 वाजता पश्‍चिमद्वार यात्रेकरिता पालखीचे गणेगावकडे प्रस्थान होणार आहे. व सोमवारी (ता. 5) रोजी दुपारी 12.30 वाजता पालखी उत्तरद्वार यात्रेकरिता ढोकसांगवी गावाकडे प्रस्थान ठेवणार आहे.

पुणे जिल्हयातील व संपुर्ण महाराष्ट्रभरातील भाविकांचे श्रद्धास्थान समजल्या जाणा-या रांजणगाव येथील महागणपती च्या दर्शनासाठी लाखो भाविक भेट देत असतात.भाद्रपद महिन्यात सुरु होत असलेला गणेशोत्सव व मुक्त द्वार दर्शन यांचे एक वेगळे वैशिष्ट्य पहावयास मिळते.अनेकजन दर्शनासाठी चालत अनवानी येत असतात.त्यामुळे या उत्सवाला वेगळेच महत्त्व असल्याचे
डॉ. संतोष दुंडे यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या