माजी जि. प. सदस्य बाळासाहेब खैरे यांचे निधन

शिक्रापूर , ता. 2 सप्टेंबर 2016- माजी जिल्हा परिषदेचे सदस्य व शेतकऱयांचे झुंजार नेते बाळासाहेब खैरे (वय 54) यांचे आज (शुक्रवार) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे  पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.

खैरे यांना गेल्या तीन वर्षांपासून डोकेदुखीचा त्रास सुरू होता. उपचारादरम्यान कर्करोगाचे निदान झाले होते. उपचारासाठी त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. तिथेच आज दुपारी 11.30च्या सुमारास त्यांचे निधन झाले. खैरे यांच्या निधनामुळे तालुकाभर शोककळा पसरली आहे. निधनानंतर शिक्रापूरात बंद पाळण्यात आला.

खैरे हे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजीक क्षेत्रातही आघाडीवर होते. वत्कृत्वामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी होती. गेली 26 वर्षे ते पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय होते. त्यांचा तालुक्याचा दांडगा अभ्यास व संपर्क होता. जनता दल ते राष्ट्रवादी कॉंग्रेस असा पक्षीय प्रवास होता. खैरे यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सदस्य, दोन वेळा पंचायत समिती सदस्यत्व, एकदा जिल्हा परिषद सदस्यत्व, दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली होती. शिवाय, शेतकऱयांसाठी आंदोलने केली होती.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या