रुग्णांची होतेय हेळसांड...

रांजणगाव गणपती, ता.३सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : वेळ दुपारची..भाजलेला मुलगा घेउन विवाहिता रुग्णालयात अालेली..डॉक्टर अनुपस्थित.मुका कर्मचारी इशा-यानेच खानाखुनी करतो.विवाहिता मलमपट्टी साठी याचना करते पण इशा-यावर उद्या या असे सांगितले.असे चिञ दुसरे तिसरे कुठले नसुन रांजणगाव गणपती येथील प्राथमिक अारोग्य केंद्राचे अाहे.

पुणे-नगर महामार्गावर मह्त्त्वाचे प्राथमिक अारोग्य केंद्र म्हणुन रांजणगाव गणपती येथील अारोग्य केंद्र ओळखले जाते.या मुळे नागरिकांची देखिल तितकिच गर्दी या ठिकाणी असते.या संदर्भात संकेतस्थळाने प्रत्यक्ष रुग्णालयात जाउन पाहणी केली असता नेहमीप्रमाणे दवाखान्यात पेशंट व्यतिरिक्त मोजकेच कर्मचारी जागेवर उपलब्ध होते.

दुपारच्या वेळी भेट दिली असता एक महिला मुलाच्या पायाला भाजलेली जखम घेउन रुग्नालयात अालेली असते.त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर नसल्याचे त्या कर्मचा-याने बोलता  येत नसल्याने हातावर लिहुन सांगितले.या कर्मचा-याला देखिल त्याच भाषेत(त्याच्या हातावर लिहुन) दवाखाना किती वाजता सुरु होतो,बंद होतो असे विचारले असता ९: ३०ते  १२: ३०  अशी दवाखान्याची वेळ असल्याचे सांगितले. या वेळी उपचारांसाठी अालेल्या त्या महिलेला देखिल घरी जाण्याचा सल्ला देण्यात येतो.तसेच दुपारच्या वेळात इतर  अालेल्या रुग्नांना देखिल उद्या या असे सांगितले.

सर्वात जास्त वर्दळ असणा-या महामार्गावर रांजणगाव गणपती येथील अारोग्य केंद्राची अशी स्थिती असल्याने रुग्णालयापासुन रुग्ण नाइलाजाने खासगी  दवाखान्यात  जात अाहेत.या ठिकानी मोठी पोलीस स्टेशन असुन ब-याचदा अारोपी तपासणींसाठी घेउन येत असतात.परंतु डॉक्टर नसतात हि लोकांची वर्दळ कायमचीच.

त्याचबरोबर शिरुर तालुक्यात निमोणे, मांडवगण फराटा अशा ठिकाणची अारोग्य यंञणा जलद व नागरिकांच्या सोयीची ठरत असताना मोठ्या प्राथमिक अारोग्य केंद्रात माञ उदासिनता दिसुन येते. न्हावरे ग्रामीण रुग्णालय, रांजणगाव गणपती या  अारोग्य केंद्रात नेहमीच वेळेचे कारण सांगितले जाते.सुट्ट्या असला कि दवाखाना बंद, दुपारची वेळ असली उपचार बंद या  नेहमीच्या कारणांमुळे रुग्नांनादेखिल मोठा ञास होत असुन अारोग्य यंञणा सुधारणार तरी कधी?  जर वेळेत उपचार मिळत नसल्याने सरकारी रुग्णालयांचा उपयोग काय? असा सवाल रुग्णांकडुन केला जातो. 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या