लग्नाचे आमिष दाखवुन बलात्कार करणाऱ्यास अटक

सणसवाडी ,  ता. ४ सप्टेंबर २०१६ (शिक्रापूर प्रतिनीधी) : येथे राहत असलेल्या एका अल्पवयीन युवतीस ओळखीतून झालेल्या मैत्रीमध्ये अडकवून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिचेवर बलात्कार करणाऱ्यास शिक्रापूर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

सणसवाडी येथे राहणारी हि युवती एका विद्यालयात शिक्षण घेत असताना तिची येथील अतिश सुखदेव दरेकर (रा. सणसवाडी) याचे सोबत ओळख झाली. यांनतर अतिश हिने तिच्या ओळखीचा फायदा घेत तिला वारंवार भेटून मैत्री वाढवली. परंतु  पिडीत युवतीच्या नातेवाईकांनी अतिश यास वारंवार समजावून सांगितले होते. परंतु नातेवाइकांनी समजावून सांगून सुद्धा अतिश याने या अल्पवयीन युवतीस गुपचूप भेटणे चालू ठेवले. आणि त्या युवतीस फूस लाऊन पळवून नेले.

सदर पिडीत युवतीस पळवून नेल्यानंतर अतिशने तिचेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. नंतर त्याने पुन्हा त्या युवतीस सणसवाडी येथे आणून सोडले आणि अतिश हा मुलीला मी तुला नेण्यास नंतर येतो असे सांगून तेथून फरार झाला. याबाबत पिडीत युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

शिक्रापूर पोलिसांनी अतिश सुखदेव दरेकर (वय–२० रा. सणसवाडी) याचे विरुद्ध अल्पवयीन युवतीस पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याबाबत तसेच बाल लैंगिक अत्याचार कलम ४ अन्वये गुन्हे दाखल केले अाहेत. परंतु अतिश हा फरार झाला होता.

अतिश यास शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून त्यास पुणे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे करीत आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या