बाप्पाचे जल्लोषात आगमन; देखावे पाठविण्याचे आवाहन !

शिरूर , ता.६ सप्टेंबर २०१६ (प्रतिनीधी) : शिरूर शहरसह तालुक्यात बुद्धीची देवता गणरायाचे सोमवारी (ता.५) रोजी आनंदात व मंगलमय वातावरणात आगमन झाले. "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या गर्जनांनी विविध गावांमधील परिसर दुमदुमून गेले होते.

विविध गावांमध्ये मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. मोठ्या उत्साही वातावरणात गणशेचा आगमन झाले आहे. विविध मंडळांनी गावा-गावांमध्ये गणपती बसवले आहेत. यासाठी ठिकठिकाणी मोठी आरास करण्यात आली आहे. मंडळांमध्ये युवकांसह अबालवृद्ध देखिल सहभागी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे आनंदामध्ये मोठी भर पडली आहे. तर ठिकठिकाणी विविध मंडळांनी देखावे तयार केले आहेत.

आवाहन
शिरूर तालुक्यातील विविध मंडळांनी मोठ-मोठे देखावे तयार केले आहेत. आपल्या देखाव्यांचे छायाचित्र shirurtaluka@gmail.comवर पाठविल्यास संकेतस्थळ व फेसबुकच्या माध्यमातून शेअर केले जातील. यामुळे आपले देखावे फक्त गावापुरते मर्यादीत न राहता जगभरातील भाविकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. शिवाय, आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱयांचे छायाचित्र व प्रोफाईलसुद्धा संकेतस्थळावर ठेवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तर आजच आपल्या मंडळाचे देखावे आमच्याकडे पाठवा.

संपर्क: तेजस फडके-९७६६११७७५५, सतीश केदारी- ८८०५०४५४९५
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या