'निमोणे आयडॉल्स'कडुन ४० गुरुवर्यांचा सन्मान

निमोणे , ता.९सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : येथील  'निमोणे आयडॉल्स'  या हॉट्स अॅप गृपच्या वतीने शिक्षक दिनानिमित आयोजित कार्यक्रमात शिक्षकांचा  सन्मान करण्यात अाला.

शिरुर तालुक्यात निमोणे अायडॉल्स या ग्रुप च्या वतीने विधायक उपक्रम राबविले जातात.याचाच एक भाग म्हणुन शिक्षकदिनाचे अौचित्य साधुन या गृपच्या वतीने विदयार्थांना दोन हजार वहयांसह पेन, पेन्सिल , खोडरबर,लंच बॉक्सेस इ. चे मोठया प्रमाणावर  वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांतील तब्बल ४० शिक्षकांचा सन्मानचिन्ह, श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रियंका गायकवाड, प्रियंका पवार, पंडित वेताळ, प्रभारी मुख्याध्यापक के.एस्. सूर्यवंशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषराव काळे, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ व्यवस्थापक महिपती काळे, निवृत पोलिस अधिकारी दादासाे गायकवाड, डॉ. पुरुषोत्तम जगदाळे, रविंद्र काळे, घोडगंगाचे चे संचालक दिलिप मोकाशी यांनी  मनोगते व्यक्त केले.कार्यक्रमाला माजी अामदार अशोक पवार हेअावर्जुन उपस्थित होते.

यावेळी केंद्र प्रमुख भोर, मुख्याध्यापक सर्जेराव काळे,  माऊली थेऊरकर, दिलिप हिंगे,हिरालाल काळे, मुरलीधर काळे, श्रीधर जगताप, श्रीधर जगताप, शाम काळे, बाबाजी काळे, विजय भोस,दत्ता जाधव, संजय काळे, संतोष काळे,  दिलिप काळे,जिजाबाई दुर्गे, शैलजा दुर्गे, प्रा. निलेश काळे, गजेंद्र थोरात, अमोल काळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी बाळासाहेब गायकवाड,डॉ. पुरुषोत्तम जगदाळे, रोहिदास काळे, नवनाथ गव्हाणे, संतोष झेंडे, अशोक गाजरे , राहुल पवार, गणेश पोपळघट यांनी प्रयत्न केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीराव वाळके यांनी केले तर आभार दिलिप हिंगे यांनी मानले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या