देवस्थानकडून वर्षभरात एकालाही दमडीची मदत नाही

रांजणगाव गणपती, ता.९सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : रांजणगाव गणपती देवस्थान ने गेल्यावर्षभरात एक हि रुग्णाला अार्थिक मदत केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत अाहे.

देशासह राज्यांत ठिकठिकाणी धार्मिक स्थळांकडुन व ट्रस्टकडुन गरिब,गरजु व अपघातग्रस्तांना अार्थिक मदत केली जात असताना रांजणगाव येथील देवस्थान ट्रस्ट माञ याला अपवाद ठरत अाहेत.

गतवर्षी कोंढापुरी येथील अपघातग्रस्त विद्यार्थ्याला देवस्थान ट्रस्ट ने मदत नाकारली होती.या घटनेला वर्ष उलटुन गेल्याने देवस्थान ट्रस्ट कडुन रुग्णांना खरोखर मदत दिली जाते का यासंदर्भात माहिती घेण्यात अाली.यात अनेक बाबी समोर येत अाहेत.

देवस्थान ने वर्षभरात किती रुग्णांना मदत केली या बाबत रांजणगाव देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा.नारायण पाचुंदकर यांच्याशी संपर्क साधला असता, देवस्थान ने मदतीसाठी निकष लावल्याने गेल्या वर्षभरात एक हि रुग्णाला मदत देण्यात अालेली नाही तसेच मदतीसाठी देवस्थान कडे वर्षभरात एक हि रुग्ण अालेला नसल्याचे प्रा.नारायण पाचुंदकर यांनी सांगितले.

 पुणे-नगर महामार्गालगत असणा-या रांजणगाव गणपती हे पविञ धार्मिक क्षेञ असल्याने भाविक श्रद्धेने महागणपतीच्या दर्शनासाठी येत असतात.त्यामुळे रांजणगाव येथील देवस्थान ला अष्टविनायक क्षेञात अनन्यसाधारण महत्त्व अाहे.या रस्त्याने जाणारा प्रत्येक भाविक थांबुन दर्शन घेत असतो तसेच काहि ना काहि मदत दानस्वरुपात  दानपेटीत टाकत असतो.

न्यायालय एकिकडे सांगते हा समाजाचा पैसा असुन  अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी वापरण्यात यावा परंतु देवस्थान माञ स्वत:चे निकष लावुन मदत देण्याचे टाळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत अाहेत. (क्रमश:)

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या