संकेतस्थळाच्या वृत्तानंतर भाविकांच्या तीव्र प्रतिक्रिया

रांजणगाव गणपती, ता.१०सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : रांजणगाव देवस्थान विरोधात संकेतस्थळाने देवस्थानकडून वर्षभरात एकालाही दमडीची मदत नाही या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नेटिझन्सनी तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शिरुर तालुक्यातील महत्त्वाचे धार्मिक क्षेञ म्हणून रांजणगाव येथील महागणपतीचे अनन्यसाधारण महत्त्व अाहे. परंतु, गेल्या वर्षभरात देवस्थानने अपघातग्रस्तांना माञ कसली ही मदत केली नसल्याचे वृत्त संकेतस्थळाने प्रसिद्ध केले होते. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या मुक्तद्वार याञेत देखील भाविकांचे प्रचंड हाल झाल्याचे सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. या बातम्यांसदर्भात अनेक नागरिकांनी थेट भेटून व फोनद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी देवस्थान विरोधात मोठा रोष व्यक्त केला. काहींनी देवस्थान अाता बदलले असल्याचे सांगितले तर काहींनी सध्या सुरु असलेल्या देवस्थानच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली अाहे.

भाविकांच्या सुख-सोयी ला प्राधान्य देणे गरजेचे असताना देवस्थान ने स्वत:चेच कार्यालय कॉर्पोरेट केले आहे. थोडक्यात भाविकांचा पैसा ट्रस्टीच्या सुखसोयींसाठीच वापरला जातो की काय? असा पश्न उपस्थित होतो. एका राजकीय नेत्याने याबाबत पदाधिकाऱयांना खडसावलेही आहे. दरम्यान, या विरोधात अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.

थेट मुख्यमंञ्यांनाच ट्विट

देवस्थानकडून वर्षभरात एकाही रुग्णाला मदत नाही ही बातमी प्रसिद्ध होताच अनेक वाचकांनी प्रतिक्रिया व्यक्त केला. एका वाचकाने थेट बातमीच मुख्यमंञ्यांना ट्विट केली. सोशल मिडिया वर काल सर्वाधिक याच बातमीची चर्चा दिवसभर केली गेली.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या