पोलीसांवरील हल्यांना पोलीसच जबाबदार : भार्इ वैद्य

शिक्रापूर ,  ता.११ सप्टेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : जगभरात पोलीसांचा धाक असून त्यांच्याविषयी जनतेत आदरयुक्त भितीही आहे.मात्र भारतात परीस्थिती उलटी आहे पोलीसांची धास्ती राहीलेली नाही.पोलीसावरच हल्ले होत आहेत याला सर्वस्वी पोलीसच जबाबदार असल्याने त्यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे असे परखड मत माजी गॄहराज्यमंत्री भार्इ वैद्य यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर येथे  रोटरी क्लब व स्व.संभाजीराव करंजे प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भार्इ वैद्य बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संगणक तज्ञ दिपक शिकारपुर होते.

या कार्यक्रमात उत्तम कांबळे यांना ग्रामीण साहित्यरत्न पुरस्कार तर दुर्गेश सोनार, हलीमा कुरेशी, हनुमंत चांदगुडे, विशाल जाधव, सचिन बेंडभर व कुंडलिक कदम यांना ग्रामीण साहित्यिक पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना भार्इ वैद्य पुढे म्हणाले की आजचा समाज स्वार्थी व चंगळवादी झाला आहे. त्यामुळे उद्योगधंदे बंद पडून बेकारी वाढत आहे तर अत्याचार व बलात्कारासारख्या घटनामध्ये वाढ होत आहे.या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देवून जाणीवपूर्वक विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यावेळी आयोजित कवी संमेलनात भरत दौंडकर(निमगाव म्हाळुंगी), रमजान मुल्ला(नागोठणे), लता ऐवळे(सांगली), विलास हडवळे(जुन्नर), आबेद शेख(यवतमाळ), हनुमंत चांदगुडे(सुपे), मनोहर परदेशी(मांडवगण फराटा) आदी कवींची बहारदार मैफल रंगली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मच्छिंद्र गायकवाड यांनी केले.संजीव मांढरे यांनी सुत्रसंचालन केले तर रामदास थिटे यांनी आभार मानले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या