देवस्थान चा अॉनलाइन ला छुपा विरोध ?

रांजणगाव गणपती, ता.११सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी)  : देशभरातील विविध देवस्थान ट्रस्ट मोठ्या प्रमाणात ऑनलाइनचा वापर करत आहेत. मात्र, येथील रांजणगाव देवस्थान ट्रस्टला ऑनलाइनचा विसर पडला असल्याचे पहायला मिळत आहे.

सविस्तर माहिती अशी कि www.shirurtaluka.com या संकेतस्थळाच्या वतीने 5 ऑगस्ट 2012 रोजी महागणपती फेसबुक पेजचे (https://www.facebook.com/Ranjangaonganpati.mahaganpati)मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले.राज्यातील अष्टविनायक तिर्थक्षेञांपैकी एक असणा-या महागणपतीचे सर्वप्रथम फेसबुकपेज तयार करण्यात आले होते.या फेसबुकपेजमुळे जगभरातील वाचक अाणखीनच जवळ येउ लागला.अाज प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन चा वापर करत असतो.त्यामुळे शिरुर तालुक्यात कोठे काय काय अाहे? काय घडते? धार्मिक ठिकाणांची माहिती घेउन त्यानुसार अनेक जगभरातील पर्यटक भेटी देत असतात. त्यामुळेच जगभरातील वाचकांचा या पेजला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. शिवाय, फेसबुकच्या माध्यमातून भाविकांना महागणपतीचे दररोज दर्शन होत आहे.

रांजणगाव देवस्थानच्या ट्रस्टच्या नवीन पदाधिकाऱयांची जुलै 2015 मध्ये निवड झाली.त्यावेळी नवीन ट्रस्टींना ऑनलाइनबाबत माहिती देण्यात आली होती. परंतुनवीन ट्रस्टींना माञ ऑनलाइनचे महत्व अद्याप समजू शकलेले नाही.या वर्षी महागणपतीच्या महाद्वार दर्शनाच्या विविध दैनिकांना जाहिराती देण्यात आल्या. परंतु, यंदाच्या जाहिरांतीमध्ये देखील ऑनलाइनचा एका ओळीचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला अाढळला नाही. दिवसेंदिवस जगभर अॉनलाइन चा प्रसार मोठ्या वेगाने होत असताना देवस्थान ट्रस्टींना माञ अॉनलाइन चा विसर का  पडतो हाच सवाल अनेकांना पडलेला अाहे.

राज्यातील विविध देवस्थाने ऑनलाइनवर माहिती प्रसारित करुन त्या त्या देवस्थानसाठी मोठ्या प्रमाणात काम करताना दिसून येतात. मात्र, येथील नवीन ट्रस्टींना ऑनलाइन जवळजवळ नकोसे झाल्याचे दिसून येत आहे. तर देवस्थान ची व प्रामुख्याने महागणपती ची माहिती जगभर का  प्रसारित होउ नये? अॉनलाईन ला देवस्थान चा छुपा विरोध तर नाही नाहि ना? याचे माञ कोडे पडलेले अाहे.
 (क्रमशः)Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या