पुर्व भागातील शेतक-यांचे डोळे कालव्याकडे

शिरूर, ता.१४ सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : चासकमान कालव्याचे बंद केलेले अावर्तन पुन्हा सुरु केल्याने पुर्व भागातील शेतक-यांच्या अाशा पुन्हा पल्लवित झाल्या अाहे.

शिरुर तालुक्याला वरदान ठरत असलेल्या चासकमान कालव्यांवर शिरुर तालुक्यातील हजारो हेक्टर शेती अवलंबुन अाहे.मध्यंतरी धरणक्षेञात झालेल्या दमदार पावसाने चासकमान धरण पुर्ण क्षमतेने भरले होते.त्यामुळे कालव्याला देखिल अावर्तन सोडले गेले.

सुमारे ५० दिवस सुरु असलेले कालव्याचे अावर्तन शिरुर च्या तालुक्यातील शिरसगाव काटा, निर्वी, कोळगाव डोळस अादी गावात न पोहोचल्य्ाने या भागातील नागरिकांना टंचाइ ला सामोरे जावे लागणार होते.या भागात पावसाचे प्रमाण देखिल अत्यल्प असुन या पुर्वी शिरसगाव काटा ला टॅंकर सुरु होता.तर पावसाचे दिवस देखिल अखेरिस अाल्याने शेतक-यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते.

या भागातील बाज-या व इतर पिके देखिल जळुन गेली असुन किमान पाणी पिण्यासाठी तरी मिळावे अशी मागणी या भागातील शेतक-यांची अाहे.

त्याचप्रमाणे संकेतस्थळाने अामदार पाचर्णे यांच्याशी संपर्क साधला असता, पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी या भागातील शेतक-यांच्या पाण्यासाठी
प्रयत्न करणारच असे त्यांनी बोलताना दोन दिवसांपुर्वी सांगितले होते.

गत अावर्तनावेळी देखिल या भागाला पाणी मिळाले नसुन या अावर्तनावेळी हाच भाग पाण्यापासुन वंचित राहिला अाहे.त्यामुळे पुन्हा सोडलेले पाणी या भागात पोहोचणे अत्यंत गरजेचे असुन पुर्व भागातील शेतकरी मोठ्या अाशेने कालव्याकडे पाण्याची चातकासारखी वाट पाहत अाहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या