नसीमा मुल्ला यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार

कासारी,  ता.१७ सप्टेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : येथील सौ.हिराबार्इ गोपाळराव गायकवाड विद्यालयातील शिक्षिका नसीमा समशेर काझी–मुल्ला यांना नुकताच ‘जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षिका’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कासारी येथील सौ.हिराबार्इ गोपाळराव गायकवाड विद्यालयातील शिक्षिका नसीमा मुल्ला यांना हा पुरस्कार  जि.प.च्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी हरूण आतार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे व  सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान  करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी आमदार पोपटराव गावडे, विक्रीकर उपायुक्त प्रशांत खराडे, माजी शिक्षणाधिकारी शेंडकर, अरूण थोरात, हनुमंत कुबडे, शिवाजीराव किलकिले, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओमासे, हरिश्चंद्र्र गायकवाड, आदीनाथ थोरात, प्रसाद गायकवाड, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विपुल शितोळे, सचिव मारूती कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र ढमढेरे, विद्या बँकेचे संचालक महेश ढमढेरे, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब गवारे, शिक्षक परीषदेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव गवळे, कार्यवाह उकीर्डे सर, प्राचार्य अशोक सरोदे यांनी प्रा. मुल्ला यांचे अभिनंदन केले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या