शिरुर पोलीसांचा पञकार,नागरिकांडुन सत्कार

शिरूर, ता.२० सप्टेंबर २०१६ (सतीश केदारी) : अहोराञ जागुन गणेशोत्सव काळात एकहि तक्रार येउ न देता गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडल्याबद्दल शिरुर तालुका पञकार व शिरुरकरांनी पोलीसांचा सत्कार केला.

गणेशोत्सव म्हटला कि प्रचंड जल्लोष अालाच.गणेशोत्सव काळात ब-याचवेळा भांडणे, मारामा-या या पुर्वी होत असल्याच्या तक्रारी येत असत.परंतु शिरुर पोलीसांनी या वर्षी प्रचंड मेहनत घेत गणेशोत्सव काळात नागरिकांची एकहि तक्रार येउ दिली नाही.गणेशोत्सव च्या दहा दिवसांच्या ठिकठिकाणी प्रचंड बंदोबस्त ठेवला.

या कामी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमोडे, मनोज नवसारे, पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील त्याचबरोबर शिरुर पोलीस स्टेशन ने शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत इतर कर्मचा-यांसह राञगस्त, ठिकठिकाणी भेटी, नागरिकांना व  विविध मंडळांना मार्गदर्शन अादी उपक्रम राबविले.त्याचमुळे गणेशोत्सव काळात शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत एक हि अनुचित प्रकार घडला नाही.

शिरुर शहर व पोलीस स्टेशन हद्दीत शिरुर च्या इतिहासात दबंग अधिका-याच्या उत्तम नियोजनामुळे प्रथमच गणेशोत्सव निर्विघ्न पार पडल्याबद्दल
शिरुर तालुका मराठी पञकार संघ व शिरुरकरांनी पोलीस निरिक्षक दयानंद गावडे व शिरुर पोलीस कर्मचा-यांचा यथोचित सन्मान केला.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या