यशस्विनीचे महिला बालगृहाबाबत पंकजाताईंना साकडे

शिरूर, ता.२२ सप्टेंबर २०१६ (प्रतिनीधी) : येथील शासकिय महिला गृहाबाबत ग्रामविकासमंञी पंकजा मुंडे यांना भेटुन विविध समस्यांबाबत लक्ष वेधले.

राज्य महिला राष्ट्रवादी च्या अध्यक्षा चिञा वाघ, माजी सभापती अॅड.कमल सावंत, यशस्विनीच्या दिपाली शेळके, नम्रता गवारी, अश्विनी कर्डिले अादींच्या शिष्टमंडळाने पंकजा मुंडे यांच्याशी विविध समस्यांबाबत चर्चा केली.

शासकिय मुलींच्या वरिष्ठ बालगृहात सन २००८ पासुन निवासी महिला अधिक्षिका हे पद रिक्त होते.गेल्या वर्षी अत्याचाराची घटना घडल्यानंतर यशस्विनी ने अांदोलन करुन हे पद भरण्याची मागणी केली होती.त्यावेळी मुंडे यांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेउन तात्पुरती जागा भरली होती.परंतु तरी देखील  नेमणुकिस असलेल्या अधिक्षिका या निवासी राहिल्याच नाहीत.
तसेच चालु वर्षी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर उशीरा येथील संस्थेत मुलींना प्रवेश दिला गेला.तसेच  प्रशासनाच्या उदासिनतेमुळे मुलींची संख्या घटली अाहे.त्याचबरोबर इतर अनेक  समस्या देखिल  या वेळी उजेडात अाल्या .

दरम्यान नेमणुकिस असलेल्या अधिक्षिका निवृत्त झाल्यामुळे पुन्हा हे पद रिक्त झाल्याचे व येथील संस्थेच्या विविध समस्या यशस्विनीच्या महिलांनी ग्रामविकास मंञी पंकजाताई मुंडे यांच्या निदर्शनास अाणुन दिल्या.त्यांनी या वेळी उपस्थित महिलांना समस्यांची दखल घेतली जाईल तसेच रिक्त पदाबाबत तातडीने योग्य निर्णय घेणार असल्याचे मुंडे यांनी यशस्विनीच्या महिलांना सांगितले.  
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या