शिरूर तालुका कृषि सहाय्यक संघटनेची बिनविरोध निवड

शिरूर, ता २६ .सप्टेंबर २०१६ (प्रतिनीधी) : महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक सघंटनेची निवडणुक प्रथमच बिनविरोध पार पडली.

या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक सघंटना शिरुर शाखेची नुकतीच बैठक पार पडली.या वेळी  शिरुर तालुकाध्यक्षपदी गुनाट येथील रहिवासी असलेले व वडगाव रासाई येथे कृषि सहाय्यक म्हणुन कार्यरत असलेले जयवंत भगत यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात अाली

कांतीलाल वीर,अशोक गायकवाड, सुनिल मोरे,व दिपक कोंडे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात अाली. तसेच अरूण जोरी यांची संपर्क प्रमुखपदी, परिमल केदारी सचिव पदी सुधाकर ढाके यांची कोषाध्यक्ष पदी,संतोष गदादे यांची कार्याध्यक्ष पदी,मधुकर दरेकर,प्रफुल्ल कामठे,रोहीणी चौधरी यांची जिल्हा प्रतिनिधि पदी व जयश्री रासकर,संध्या सांडभोर,संजीवणी रासकर यांची तालुका महिला संघटकपदी, तालुका कार्यकारणीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणुन प्रशांत दोरगे यांची बिनविरोध निवड झाली.

या प्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी युसुफ तडवी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन संभाजी वाघचौरे व दत्ता माने यांनी काम पाहिले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या