ज्ञानमंदिरातच दलित तंटामुक्ती अध्यक्षाला बेदम मारहाण

शिरसगाव काटा , ता २७ .सप्टेंबर २०१६ (प्रतिनीधी) : राज्यात अॅट्रोसिटी कायदा रद्द करण्याची मागणी जोर धरत असताना येथील दलित तंटामुक्ती अध्यक्षाला मारहाण करण्यात अाल्याची घटना घडली.

मिळालेली  माहिती अशी कि, येथील शिरसगाव काटा येथील जि.प प्राथमिक शाळेत  अाज शालेय व्यवस्थापन समिती च्या निवडीसंदर्भात दुपारी पालकांची मिटिंग अायोजित करण्यात अाली होती.या वेळी जि.प.शाळेत मिटिंग सुरु करण्यात अाली होती. या वेळी झालेल्या गोंधळात येथील माजी सरपंच रामचंद्र केदारी व त्यांच्या पत्नी यांना गावातीलच लोकांकडुन बेदम मारहाण करण्यात अाली. या वेळी झालेल्या मारहाणीत केदारी यांना चांगलीच दुपाखत झाली.

हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांसमोरच ज्ञानमंदिराच्या पविञ प्रांगणात घडल्याने  विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले अाहे.तर मुख्याध्यापक अाढाव यांनी अतिशय कडक पद्धतीत प्रक्रिया सुरु ठेवल्याचे काहि पालकांनी बोलताना सांगितले अाहे.

रामचंद्र केदारी हे गावचे माजी अादर्श सरपंच असुन विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष  अाहेत.
 
या प्रकरणी वैद्यकिय तपासणी साठी केदारी यांना ससुन ला पाठविले गेले असल्याने राञी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या मारहाणीचे वृत्त पसरताच ठिकठिकाणी चर्चांना उधाण अाले अाहे.
(सविस्तर वृत्त लगेचच)
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या