संवेदना जागवली म्हणुन...

रांजणगाव गणपती , ता. ४अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : धोधो कोसळणारा पाउस..रस्त्याच्या कडेला पावसात कुडकुडत असलेले बालक..येणारे जाणारे फक्त बघताहेत..पण पुढे त्या बालकाचे काय होते?..

सविस्तर माहिती अशी कि,पुणे-नगर हायवे लगत रांजणगाव च्या व कोंढापुरी च्या दरम्यान रस्त्याच्या कडेला अर्धनग्न अवस्थेत पावसात भिजत असलेल्या अवस्थेत बालक गेल्या दोन-तीन दिवसांपासुन पडुन होते.दरम्यान रांजणगाव गणपती येथीलच युवक पप्पु पवार हे कामानिमित्त जात असताना त्यांना त्या मुलाची अशी अवस्था दिसली.त्यांनी क्षणाचाहि विलंब न लावता त्या बालकाला उचलुन बाजुला घेतले.पोटात अन्नाचा कस  नसल्याने अशक्तपणा अालेल्या त्या बालकाला त्यांनी हॉटेल ला खाउ घातले.इतकेच नव्हे तर स्वत: कपडे घेतली.दरम्यान त्या मुलाचा एक पाय व एक हात काम करत नसल्याचे लक्षात अाले.तो बालक अपंग असल्याचे देखिल निदर्शनास अाले.त्याच्या चेह-यावर व इतर ठिकाणी किरकोळ जखमा झाल्या असल्याचे देखिल दिसले.

या मुलाची हि अवस्था लक्षात अाल्याने त्यांनी शिरुर येथील एका  संस्थेत दाखल करण्यासाठी स्वखर्चाने घेउन गेले.तेथे संस्थेने असमर्थतता दर्शविल्यानंतर पोलीसांना कळविन्यात अाले.परंतु शिरुर पोलीसांनी रांजणगाव पोलीस स्टेशन ला जाण्यास सांगितले.एवढा प्रकार घडुन देखिल पवार यांनी न हारता पुन्हा रांजणगाव पोलीस स्टेशन गाठले.तेथील पोलीसांच्या कानावर हा प्रकार घातला.रांजणगाव पोलीसांनी सर्वतोपरी मदतीचे अाश्वासन दिले.

दरम्यान पवार यांनी पोलीस स्टेशन चे सर्व सोपस्कार पुर्ण करुन त्या बालकाला त्याच्या मुळगावी थेट पाठवण्याची व्यवस्था केली.दरम्यान च्या काळात शिरुर च्या अाकांक्षा संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे,उद्योजक जयराम चिखले,रांजणगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार तेलंग व सहका-यांनी पप्पु पवार यांना मोलाची मदत केली.

समाजात अापण माणुसकि हरवत चालली असल्याची अनेक उदाहरणे दररोज अनुभवत असतो.परंतु पवार यांनी केवळ मदतच नाहि तर थेट गावापर्यंत सोडण्याची तपत्परता दर्शविल्याने समाजात संवेदना जागी असल्याचा या घटनेवर प्रत्यक्ष अनुभव घेता अाला.

जर पवार यांनी मदतच केली नसती तर?...
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या